फळबाग बागायतीमधून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असतो. राज्यातील अनेक शेतकरी या फळबाग शेतीपासून दूर आहेत. वंचित असलेले शेतकरी फळबाग शेतीकडे वळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. फळबाग लागवडीला प्रोत्साहन म्हणून सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम हाती घेतला.
यासाठीची लाभार्थी पात्रता
-
अनुसूचित जाती
-
अनुसूचित जमाती
-
भटक्या जमाती
-
भटक्या विमुक्त जमाती
-
दारिद्रय रेषेखालील कुटुंबे
-
महिला प्रधान कुटुंब
-
शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे
-
भूसुधार योजनेचे लाभार्थी
-
इंदिरा आवास योजनेचे
जे अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत असलेले वननिवासी( वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ पात्र असलेल्या व्यक्ती.वरती उल्लेख केलेल्या पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषी कर्ज माफी योजना सन २००८ नुसार लहान शेतकरी( एक हेक्टर पेक्षा जास्त पण दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी( जमीन मालक किंवा कुळ) हे सगळे योजनेसाठी पात्र आहेत.
अर्ज कुठे करावा?
या योजनेसाठी चा अर्ज तालुका स्तरावरील कृषी अधिकारी कार्यालयात करावा.
फळझाडांची कलमे/ रोपे कुठून खरेदी कराल
-
कृषी विभागाच्या रोपवाटिकांमधून
-
कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिकांमधून
-
खाजगी शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका
-
सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभाग रोपवाटिका
-
शेतकऱ्यांनी रोपे खरेदी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.
या योजनेमध्ये समाविष्ट असलेली फळपिके
आंबा रोपे, आंबा कलमे, आंबा कलमे(५ बाय ५), काजू कलमे, चिकू कलम, पेरू कलम, डाळिंब कलम, डाळिंब कलमे(४.५ बाय ३), संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे, नारळ रोपे, नारळ रोपे( टी. डी), बोर रूपे(५ बाय ५), सिताफळ रोपे, सिताफळ कलम, कागदी लिंबू रोपे,, आवळा रोपे, आवळा कलम, चिंच कलमे विकसित जाती, चिंच, कवट, जांभळ रोपे, फणस रोपे, फणस कलमे, अंजीर कलमे, सुपारी, बांबू रोपे, करंज व औषधी वनस्पती, सोनचाफा, कढीपत्ता
औषधी वनस्पती
अर्जुन, असन, अशोका, बेहडा, बेल, हिरडा, डिकेमाली, रक्तचंदन, रेखा, आयरन, शिवण, गुगुळ, वावडिंग, बिब्बा रोपे इत्यादी.
लागवड कालावधी
वर्षाच्या जून ते नोव्हेंबर दरम्यान लागवड करणे आवश्यक आहे.
माहिती स्त्रोत- कृषि क्रान्ति
Share your comments