1. इतर बातम्या

Horoscope: 'या' पाच राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना ठरणार शुभ

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती आणि गोचर यामुळे जीवनात बदल घडत असतात. यामुळे ग्रहांच्या गोचरांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे.

Horoscope August

Horoscope August

ज्योतिषशास्त्रानुसार (According to astrology) प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती आणि गोचर यामुळे जीवनात बदल घडत असतात. यामुळे ग्रहांच्या गोचरांना ज्योतिषशास्त्रात (astrology) विशेष महत्त्व आहे.

ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची स्थिती

सूर्य- महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असेल आणि 17 ऑगस्टपासून सिंह राशीत प्रवेश करेल.

चंद्र- प्रत्येक सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करणार

मंगळ- महिन्याच्या सुरुवातील मेष राशीत आणि 10 ऑगस्टपासून वृषभ राशीत प्रवेश करेल.

बुध- 1 ऑगस्टपासून सिंह राशीत असेल आणि 20 ऑगस्टपासून कन्या राशीत प्रवेश करेल.

गुरु- मीन राशीत वक्री असणार आहे.

शुक्र- महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत असेल आणि 6 ऑगस्टर कर्क राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 31 ऑगस्टपासून सिंह राशीत प्रवेश करेल.

शनि- मकर राशीत वक्री स्थिती असेल.

राहु- मेष राशीत असणार आहे.

केतु- तूळ राशीत असणार आहे.

बुद्धिमत्ता, पैसा, तर्क, व्यवसाय यांचा कारक असलेला बुध ग्रह 1 ऑगस्ट रोजी राशी बदलणार आहे. बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे 5 राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2022 छान जाईल. या लोकांना ऑगस्टमध्ये यश आणि पैसा मिळेल. बुध ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि 1 ऑगस्ट 2022 रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीतील बुधाचे संक्रमण 5 राशीच्या लोकांना खूप लाभ देईल.

हे ही वाचा 
Onion Prices: कांद्याच्या किमतीबाबद सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय

वृषभ - बुधाच्या राशी बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. त्यांना नवीन नोकरीची ऑफर, बढती मिळू शकते. उत्पन्न वाढेल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. मानसिक सुख आणि शांती अनुभवाल. पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. करिअरमध्ये एखाद्या मित्राची साथ मिळेल. उत्पन्न वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल.

हे ही वाचा 
PM KISAN! आनंदाची बातमी; आता पीएम किसान योजनेचा हप्ता येणार 4,000 रुपये

कन्या - कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. नोकरी किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकता. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. स्थलांतराची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तसेच अधिकारी सहकार्य करतील.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. आदर वाढेल. करिअरमध्ये फायदे होतील. व्यावसायिकांच्या कामाचा व्याप वाढेल आणि आर्थिक स्त्रोत वाढतील. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम सोपे होईल. धार्मिक कार्यक्रमात भाग घेता येईल.

मीन - वरिष्ठांच्या मदतीने करिअरमध्ये लाभ होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. प्रगती करता येईल. पुढे जाण्याची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
Arvind Kejriwal: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: पुढील 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार
MonkeyPox: जगभरात मंकीपाॅक्स विषाणूचे थैमान; जाणून घ्या मंकीपाॅक्सची लक्षणे
Gas Cylinder! घरगुती गॅसच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या आजच्या किंमती

English Summary: Horoscope August auspicious people five zodiac signs Published on: 24 July 2022, 05:43 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters