1. इतर बातम्या

स्कूटी मधील सुपर्ब होंडा ॲक्टिवा होणार आता इलेक्ट्रिक स्कूटर,अशी असतील वैशिष्ट्ये

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला पोचले आहेत.सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी अशी पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. त्यामुळे पेट्रोल बाइक्स चालवणे अक्षरशा नकोसे होऊन बसले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
honda activa

honda activa

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला पोचले आहेत.सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी अशी पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. त्यामुळे पेट्रोल बाइक्स चालवणे अक्षरशा नकोसे होऊनबसले आहे.

त्यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्याप्रमाणात बोलबाला सुरू आहे. इलेक्ट्रिक दुचाकी असो की कार याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर च्या सेगमेंटमध्ये आता स्कूटर मार्केटमधील प्रथम स्थानी असलेली होंन्डा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया हे देखील आपले उत्पादन लॉंच करण्याची शक्यता आहे.

होंडाची एक्टिवा स्कूटी आता होणार इलेक्ट्रिक स्कूटर?

 जर स्कूटर सेगमेंट चा  विचार केला तर भारतामध्ये आघाडीवर सध्या होंडा एक्टिवा आहे. होंडा एक्टिवा ची सध्या बाजारामध्ये सहा जी मॉडेल उपलब्ध आहे. होंडा खूप लवकर भारतीय बाजारामध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू शकते वही नवीन स्कूटर होंडा एक्टिवा वर आधारित असेल.होंडा कंपनी एप्रिल 2022 पासून मार्च दोन हजार ते वीस पर्यंत भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. 

याबाबत कंपनीने अजून काही सांगीतलेले नसले तरी नुकत्याच होंडाची बेन्लीईस्कूटर भारतात चाचणी दरम्यान पाहायला मिळाली होती. मिळालेल्या बातम्यांनुसार होंडा कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये वरचढ ठरण्यासाठी ॲक्टिवा च्या ब्रँड देखील वापरू शकते. आता सध्या बाजारात ओला एस 1, अथर 450 एक्स,बजाज चेतक, ओकिनावा, हीरो इलेक्ट्रिक यासारख्या स्कूटर ब्रँड उपलब्ध आहेत.

English Summary: honda motercycle launch electric scooter soon like as honda activa Published on: 27 February 2022, 01:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters