1. इतर बातम्या

Honda Scooter: 9000 भरा आणि घरी घेऊन जा होंडा ऍक्टिवा; जाणुन घ्या या विशेष ऑफरविषयी

होंडा भारतातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी आहे. होंडा कंपनीची ऍक्टिवा ही स्कूटर देशात मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंद बनली आहे. ही स्कूटर आपल्या स्टायलिश लुकमुळे देशात सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर ठरली आहे. या गाडीची किंमत मध्यमवर्गीय लोकांच्या बजेटमध्ये फिट होणारी आहे, तसेच या गाडीचे लुक आणि दमदार मायलेज यामुळे ही गाडी मध्यमवर्गीयांसाठी बजेट फ्रेंडली असल्याचे सांगितले जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
HONDA ACTIVA

HONDA ACTIVA

होंडा भारतातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी आहे. होंडा कंपनीची ऍक्टिवा ही स्कूटर देशात मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंद बनली आहे. ही स्कूटर आपल्या स्टायलिश लुकमुळे देशात सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर ठरली आहे. या गाडीची किंमत मध्यमवर्गीय लोकांच्या बजेटमध्ये फिट होणारी आहे, तसेच या गाडीचे लुक आणि दमदार मायलेज यामुळे ही गाडी मध्यमवर्गीयांसाठी बजेट फ्रेंडली असल्याचे सांगितले जाते.

अनेक लोकांना होंडा ॲक्टिवा स्कूटर खरेदी करायची असते मात्र एकरकमी पैसा उपलब्ध नसल्याने ते स्कूटर खरेदी करू शकत नाहीत मित्रांनो जर आपणासही होंडा ॲक्टिवा 6g खरेदी करायची असेल मात्र एकरकमी पैसा उपलब्ध नसेल तर आपण ही स्कूटर मात्र नऊ हजार रुपये डाऊन पेमेंट करून घरी येऊन जाऊ शकता. आज आम्ही आपणास नऊ हजार रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर किती रुपयाचा ईएमआय भरावा लागू शकतो याविषयी जाणुन घेणार आहोत.

हे वाचा: Smart Tv: फ्लिपकार्टवर 23 हजाराचा स्मार्ट टीव्ही फक्त 800 रुपयात मिळतोय; जाणुन घ्या याविषयी

मित्रांनो Honda कंपनीची Activa 6G STD ह्या मॉडेलची दिल्ली मध्ये ऑन रोड किंमत 81,907 रुपये एवढी आहे. जर आपल्याकडे एवढी मोठी किंमत उपलब्ध नसेल तर आपण ही स्कूटर 9000 रुपये एवढे कमी डाउनपेमेंट भरून विकत घेऊ शकता.

9000 रुपये डाउनपेमेंट भरल्यानंतर ह्या स्कूटरवर बाइक देखो EMI कॅल्क्युलेटरनुसार,  3 वर्षांसाठी 8 टक्के व्याजासह 2511 रुपये एवढा ईएमआय अर्थात मासिक हफ्ता असेल. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तुम्हाला 3 वर्षात सुमारे 17,489 रुपये एवढे व्याज द्यावे लागणार आहे.

हे वाचा: Good News: 40 हजाराचा iphone 'या' ठिकाणी मिळणार फक्त 25 हजार रुपयाला

मित्रांनो Honda Activa 6G वर उपलब्ध असलेले कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर ह्या सर्व्या गोष्टी तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असणार आहेत. जर तुमच्या बँकिंग किंवा CIBIL स्कोअरचा नकारात्मक अहवाल असेल तर बँक त्यानुसार या तिन्हींमध्ये बदल करू शकते. त्यामुळे आपणास अधिक व्याजदर आकारला जाऊ शकतो तसेच डाउनपेमेंट देखील अधिक भरावे लागू शकते एवढेच नाही तर आपणांस अधिक रकमेचा ईएमआय देखील द्यावा लागू शकतो.

English Summary: honda activa scooter get only at 9000 know more about it Published on: 27 February 2022, 10:14 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters