देशात सगळीकडे सणा-सुदीच्या दिवसात अनेक लोक सोन्या-चांदीची आणि वाहनाची खरेदी करतात. सणा-सुदीच्या पवित्र दिवसात शुभ कार्य करण्याची आपल्याकडे रीत असल्याने या दिवसात गाड्यांची खरेदी केली जातं असल्याचे सांगितले जाते.
या महिन्यात होळी (Holi Festival) हा सण येणार आहे या पार्श्वभूमीवर अनेक लोक टू व्हीलर ची खरेदी करतील. जर आपणास देखील, होळीच्या सणाला होंडा या अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनीची (Automobile Company) होंडा ॲक्टीव्हा (Honda Activa) ही स्कूटर खरेदी करायची असेल तर आज आम्ही आपल्यासाठी एक विशेष भन्नाट ऑफर विषयी (Offer On Activa) महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आम्ही पाच हजार रुपये डाऊन पेमेंट भरून होंडा एक्टिवा खरेदी केल्यानंतर किती रुपयाचा मासिक हप्ता बसतो या विषयी माहिती घेऊन आलो आहोत.
मित्रांनो Honda Activa 6G STD मॉडेलची दिल्ली मध्ये ऑन रोड किंमत 81907 रुपये एवढी आहे. परंतु जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम अवेलेबल असेल तर आपण केवळ 5000 रुपये डाऊन पेमेंट देऊन ही स्कूटर खरेदी करू शकता. Bike Dekho EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही पाच हजार रुपये डाऊन पेमेंट भरले तर तुमचा EMI 3 वर्षांसाठी 8 टक्के व्याजासह 2,410 रुपये असेल. म्हणजे तुम्हाला 2410 रुपये मासिक हप्ता पडेल. एकंदरीत तुम्हाला 3 वर्षात 9,853 रुपये व्याज द्यावे लागेल.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, Honda Activa 6G वर उपलब्ध असलेले कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर ह्या सर्व्या गोष्टी आपल्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असतात. जर आपल्या बँकिंग किंवा CIBIL स्कोअरमध्ये नकारात्मक अहवाल असेल तर बँक त्यानुसार या तिन्हींमध्ये बदल करू शकते.
Share your comments