1. इतर बातम्या

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज केलाय ? पण कार्ड नाही मिळाले तर 'येथे' करा बँकेविरोधात तक्रार

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली जात आहे. यात कार्डाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना मिळू शकते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली जात आहे. यात कार्डाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना मिळू शकते. याशिवाय शेतकऱ्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे विना तारण दिले जाते. बँकेत जाऊन शेतकरी अर्ज दाखल करुन हे कर्ज घेऊ शकतात. यासाठी शेतकरी को-ऑपरेटिव्ह बँक, क्षेत्रिय ग्रामीण बँक, नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये संपर्क करु शकतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार असते की आम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला पण आम्हाला कार्ड मिळाले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याविषयीची एक मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी केसीसीससाठी अर्ज केला असेल तर मोजून पंधरा दिवसात बँकांना किसान क्रेडिट कार्ड द्यावे लागेल. जर दिलेल्या वेळात बँकेने कार्ड दिले नाही तर शेतकरी आता बँकेविरोधात तक्रार करू शकतील. यासाठी बँकिंग लोकपालशी संपर्क करू शकतात. यासाठी तुम्हाला बँकिंग लोकपालला तक्रार करावे. ज्याच्या अधिकार क्षेत्रात बँक शाखा किंवा कार्यालय असेल तर शेतकरी आरबीआयच्या कम्पलेंट मॅनेजमेंट सिस्टम (सीएमएस) च्या माध्यमातून बँकेच्या विरोधात तक्रार करू शकतात.


हे एक सॉफ्टवेअर आहे, याच्या मार्फत ग्राहक घरी बसून बँकेविरोधात तक्रार करु शकतील. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक https://cms.rbi.org.in/ वर भेट देऊ शकतात. यासह शेतकरी किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाईन नंबर ०१२०-६०२५१०९ किंवा १५५२६१ आणि ग्राहक ईमेल pmkisan-ict@gov.in च्या माध्यमातून या हेल्फ डेस्क वरही संपर्क करु शकतात.

किसान क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी पात्रता अटी


सर्व शेतकरी जे एकटे काम करतात तसेच शेती किंवा शेतीत अधिक लोकांसह एकत्र काम करतात

मालक व इतर शेती करणारे लोक.

सर्व भाडेकरु शेतकरी किंवा तोंडी पट्टेदार आणि शेतीतील भागदार यांचाही यात समावेश असून हेही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात.


किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) साठी आवश्यक कागदपत्रे


पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टची फोटोकॉपी इत्यादी.
ओळखीचा पुरावा
आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त आयडी सारख्या पत्त्याचा पुरावा.
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
योग्य पद्धतीने भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज.
अर्जदारांनी लक्षात घ्यावे की बँकेच्या अंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार कागदपत्रे आणि इतर औपचारिकता बदलू शकतात. वरील यादीमध्ये केवळ काही मूळ कागदपत्रे समाविष्ट आहेत.

English Summary: Have you applied for Kisan Credit Card? But if you don't get the card, make a complaint against the bank Published on: 02 November 2020, 05:43 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters