Gudi Padwa 2023: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात.
गुढीपाडवा शुभ मुहूर्त
उदय तिथी नुसार 22 मार्च 2023 बुधवारला गुढी पाडवा साजरी होणार
गुढी पाडवा पूजा मुहूर्त: सकाळी 06.29 AM ते सकाळी 07.39 AM (22 मार्च 2023)
गुढी उभा करण्यासाठी साहित्य
वेळूची काठी
कडुलिंबाचा पानं
आंब्याची पानं
दोन तांब्याचे कलश
काठापदराची साडी
ब्लाऊज पीस
साखरेचा हार
खोबऱ्याचा हार
लाल कलरचा धागा
चौरंग किंवा पाठ
फुलांचा हार
गुढी पूजा साहित्य
कलश
हळदी
कुंकू
तांदूळ
पाणी
पंचामृत
साखर
पिवळे चंदन
अक्षदा
थोडीशी फुलं
आरती
कापूर
अगरबत्ती किंवा धूप
लक्ष्मी मातेची नाणी
सुपारी
पानं
सुपारी
गुढी पाडवा पूजा विधी
वेळूची काठी स्वच्छ धूवा.
आता त्या काठीवर साडी आणि ब्लाऊज पीस दोरीच्या साह्याने बांधा.
आंब्याची पानं आणि कडुलिंब बांधा.
साखरेची माळ आणि फुलांचा हार घाला.
कलशावर पाच हळदीकुंकाचे बोट लावा.
शिवाय स्वास्तिक काढा.
आता हे कलश काठीवर पालथ घाला.
ही गुढी पाट किंवा चौरंगावर उभी घराच्या मुख्य दाराजवळ उभी करा.
Share your comments