1. इतर बातम्या

बाजारात आलेली सोन्याच्या तेजी तात्पुरती टिकणार- जळगावातील तज्ञांचा अंदाज

जगभरातील शेअर बाजार घसरले असून भारताचा शेअर बाजार देखील तीन टक्क्यांनी घसरला आहे त्याच्या मागे रशिया युक्रेन दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती चा हा परिणाम आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसाचा विचार केला तर सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाले

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the gold

the gold

जगभरातील शेअर बाजार घसरले असून भारताचा शेअर बाजार देखील तीन टक्क्यांनी  घसरला आहे त्याच्या मागे रशिया युक्रेन दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती चा हा परिणाम आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसाचा विचार केला तर सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाले

परंतु ही झालेले भाववाढ जास्त दिवस नटिकता येणाऱ्या सात आठ दिवसात वाढलेले दर पुन्हा घसरतील  असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.सध्याच्या सोन्याच्या बाजारपेठेचा विचार केला तर देशामध्ये आणि स्थानिक पातळीवर लग्नसराई नसल्यामुळे सध्याचा हंगाम हा सोने खरेदीचा नसून झालेली दरवाढ ही आंतराष्ट्रीय जगतातील घडामोडीवर झाली असून ती तात्पुरती टिकेल असा दावा तज्ज्ञांनी केला. भारती शेअर मार्केट मध्ये तीन टक्क्यांनी घसरण झाल्यामुळे भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झालेली आहे. सोन्याचे मोठे मार्केट असलेल्या जळगाव मध्ये सोन्याचे दर प्रति तोळ्याला 51 हजार 300 ते 51 हजार चारशे च्या दरम्यान झाले आहेत.तर चांदी  प्रतिकिलो 65 हजार 500 रुपये पर्यंत पोहोचले आहे.

सोन्याचे दर वाढ या प्रकारच्या व्यवहारामुळे

 त्या अगोदर चा विचार केला तर एक नंबरचे सोने व दोन नंबरच्या सोन्याच्या भावामध्ये मोठा फरक असायचा परंतु केंद्र सरकारच्या कायद्याने सोने खरेदीसाठी पैसे पाठवून मागणी केल्यास त्या  मनी लॉन्ड्रिंग  नुसार गुन्ह्यास पात्र ठरवण्यात येईल असे निर्बंध घातल्याने दोन नंबरच्या सोन्याच्या व्यवहारांवर मोठे नियंत्रण आले आहे. परंतु तरीसुद्धा काही प्रमाणात असे व्यवहार होतच असतात. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हवालाच्या प्रती एक लाख रुपयांच्या व्यवहारासाठी तीनशे रुपयांचीआकारणी केले जाते. त्यामुळे दोन नंबरच्या सोन्याचे दर हे तीनशे रुपये अधिक आहेत.

सोन्याच्या भावातील चढ-उताराचा ची कारणे

  • डॉलरचे किमतीमध्ये होणारे चढ-उतार
  • आंतरराष्ट्रीय बँकांनी केलेली व्याजदरांमध्ये वाढ
  • विविध देशांच्या बँकांनी स्वतः सोने विकत घेतले किंवा विक्रीला काढले.गेल्या काही वर्षाचा विचार केला तर चीन, कोरिया व भारताने देखील सोने विक्रीला काढले होते
  • दोन राष्ट्रांमधील( युक्रेन आणि रशिया) युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन तणावाचे वातावरण झाले आहे.
English Summary: growth in gold rate is temprorary some situation caused for this rate growth Published on: 16 February 2022, 08:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters