1. इतर बातम्या

नादच खुळा! आजीने वयाच्या ९४व्या वर्षी जागतिक स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक; धैर्याला आणि आत्मविश्वासाला सलाम

नवी दिल्ली: अनेकांना आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात पण वय आडवे येते. वयोमानानुसार आता होत नाहीत असे उत्तर दिले जाते. पण आता वर ९४वर्षांच्या भगवानी देवी डागर या आजीने मात केली आहे. या ९४वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी या सर्व मर्यादा मोडून काढल्या आहेत.

Bhagwani Devi Dagar

Bhagwani Devi Dagar

नवी दिल्ली: अनेकांना आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात पण वय आडवे येते. वयोमानानुसार आता होत नाहीत असे उत्तर दिले जाते. पण आता वर ९४वर्षांच्या भगवानी देवी डागर (Bhagwani Devi Dagar) या आजीने मात केली आहे. या ९४वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी या सर्व मर्यादा मोडून काढल्या आहेत.

त्यांनी या वयात फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेमध्ये १०० मीटर स्प्रिंट(वेगात चालणे) प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वजण चकित झाले आहेत.

Tata Motors: Tata Motors ने रचला नवा विक्रम; "या" पाच कारची सर्वांधिक विक्री..

खेळ खेळण्यासाठी वय नाही तर जिद्द महत्वाची असते. भगवानी देवी यांनी १०० मीटर अंतर २४.७४ सेकंदात पार केले. याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. तिथेही त्यांनी कांस्य पदक मिळविले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे भरपूर कौतुक होत आहे. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी सलाम केला आहे.

Rain Update: पुण्यासह सात जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. मंत्रालयाने लिहिले, “भारतातील ९४ वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.”

भगवानी देवींचा नातू विकास डागर हा देखील पॅराअ‍ॅथलीट असून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदके जिंकून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

ब्रेकिंग! शिंदे सरकार पडणार की टिकणार, सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश, आमदारांवर...

English Summary: Grandmother won a gold medal at the World Championships at the age of 94 Published on: 11 July 2022, 04:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters