Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने 25 वर्षीय धनराज माळी या विजयी सदस्याचा मृत्यू झाला.
पराभूत गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप मृत सदस्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर जामनेरमध्ये तणावाचं वातावरण पसरले आहे. मृतदेह रुग्णालयात ठेवल्याने उपजिल्हा रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे.
मुलगी शिकली सरपंच बनली! अवघ्या 24 व्या वर्षात 'ही' सुंदर मुलगी झाली गावची कारभारीन
Gram panchayat Election Result 2022: विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं होतं. रायगड जिल्ह्यातून एक बातमी येते ती म्हणजे, एका 24 वर्षीय तरूणीने ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली.
या तरूणीला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. राजकारणात नवखी असतानाही साडेपाचशे मतांच्या फरकाने या तरूणीने विजय मिळवला आहे. रायगड मधील दासगाव येथील 24 वर्षीय तपस्या जंगम (Tapasya Jangam) हिने राजकारणात उडी घेत पहिलाच प्रयत्न तिचा यशस्वी ठरला आहे. तपस्याने नुकतीच हॉटेल मॅनेमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर तिला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती.
राजकारणात नवखी असतानाही साडेपाचशे मतांच्या फरकाने तिने विजय मिळवला. गावच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच आपण राजकारणात उतरल्याचे तपस्याने सांगितले. तिच्या विजयानंतर ग्रामस्थानी एकच जल्लोष साजरा केला.
कमी वयात तपस्याने ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली. रायगड जिल्ह्यातील दासगावमधून सर्वत्र भागातून तिचे कौतुक होत आहे.
Share your comments