कमी जोखमीचे रिटर्न किंवा गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची एक योजना तुम्हाला फायद्याची पडू शकते. भारतीय पोस्ट विभागामार्फत देण्यात येणारी ग्राम सुरक्षा योजना एक गुंतवणुकीसाठी असा पर्याय आहे की ज्यामध्ये कमी जोखीम मध्ये चांगले रिटर्न मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत बोनस सोबत ठराविक रक्कम 80 वर्षाच्या वयात युवा मृत्यूच्या स्थितीत कायदेशीर वारस व्यक्तीला मिळूकरू शकते.
ग्राम सुरक्षा योजनेचे नियमवअटी
- 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. किमान विमा रक्कम दहा हजार रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
- प्रीमियम पेमेंट मासिक,तिमाही, सहामाही किंवा वार्षिक भरू शकता. प्रीमियम चे पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सुट आहे. पॉलिसी कालावधीत प्रीमियम न भरल्यास बंद पडण्याच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम चे पेमेंट करू शकतात. ही विमा योजना कर्ज सुविधा सोबत येते, ज्याचा लाभ पॉलिसीधारकाला चार वर्षानंतर मिळतो.
सरेंडर पॉलिसी
ग्राहक तीन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र अशा वेळी कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसी चे सर्वात मोठे आकर्षण इंडिया पोस्ट द्वारे दिला जाणारा बोनस आणि अंतिम घोषितबोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति एक हजार रुपये आहे.
मॅच्युरिटी बेनिफिट
19 वर्षाच्या वयात दहा लाखाची ग्रामसुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षासाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षासाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1 हजार 411 रुपये असेल. पॉलिसी खरेदी करणाऱ्याला 55 वर्षासाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल.
साठ वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये होईल.
माहिती
नामांकित व्यक्ती चे नाव किंवा इतर माहिती असे ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर मध्ये कोणत्याही अपडेट च्या बाबतीत ग्राहक जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊ शकतो.इतर प्रश्नांसाठी ग्राहक दिलेली टोल फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाईट www.postallifeinsurence.gov.inवर संपर्क करू शकतात.
Share your comments