सरकारने प्रवास भत्त्यात दोन प्रकारे वाढ केली आहे. एकीकडे सरकारने एकूण प्रवास भत्त्यात वाढ केली असतानाच कर्मचाऱ्यांना राजधानी, दुरांतो एक्स्प्रेस आणि तेजस सारख्या ट्रेनच्या प्रवासासाठीही पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे त्यांच्या प्रवासाचा दर्जा वाढला आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुप्पट बोनस दिला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central employees) सरकारकडून दिवाळीची मोठी भेट (Big Gift) मिळाली आहे. दिवाळीपासून महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता म्हणजेच टीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेने केंद्रीय कर्मचारी चांगलेच खूश दिसत आहेत.
प्रवास भत्त्यात वाढ
सरकार कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी प्रवास भत्ता देते जो त्यांच्या पगाराचा भाग आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच सरकार त्यात सुधारणाही करते. डीए 34 वरून 38 टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे टीएमध्येही वाढ झाली आहे. TA तीन श्रेणींमध्ये विभागलेला आहे.
हेही वाचा: भारतात स्वस्त लॅपटॉप JioBook लाँच; जाणून घ्या फीचर्स, किंमत
TA सह DA सामील होतो
पहिल्या श्रेणीमध्ये, स्तर 1-2 शहरांसाठी 1350 रुपये, स्तर 3-8 च्या कर्मचार्यांसाठी 3600 रुपये आणि वरील स्तर 9 साठी 7200 रुपये आहेत. कोणत्याही एका श्रेणीतील कर्मचाऱ्यांना त्याच दराने प्रवास भत्ता मिळतो आणि त्यात महागाई भत्ता जोडला जातो.
हेही वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सर्वसामान्यांना मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ; असा करा अर्ज
Share your comments