1. इतर बातम्या

सरकारचा मोठा निर्णय - ५० हजार रुपयांच्या कर्जावरील व्याजदरात सूट

देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी  २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याचबरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाते. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.

दरम्यान सरकारने यात अजून कपात केली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात मुद्रा लोनविषयी निर्णय घेण्यात आला. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी जावडेकरांनी एक आनंदाची बातमी दिली. मुद्रा कर्ज योजनेतून ५० हजार रुपयांचे कर्ज घेणाऱ्यांना लाभार्थ्यांना आकारण्यात येणाऱ्या व्याजदरात २ टक्क्यांची सूट देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  दरम्यान या निर्णयामुळे शिशु योजनेतून ९ कोटी ३५ लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हा निर्यण १ जूनपासून लागू होणार असून ३१ मे २०२१ पर्यत या निर्णयाची अमंलबाजावणी केली जाणार आहे. यावेळी जावडेकर म्हणाले की, याआधी फेरीवाले, भाजीवाले, सलून, छोटे दुकानदार सावकारांपासून पैसे घेत असत. त्यामुळे त्यांना अधिक व्याज द्यावे लागत होते. आता त्यांना बँकेतून कर्ज मिळते शिवाय व्याजदरही कमी असते आता तर यात २ टक्क्यांची सूट देखील देण्यात आली आहे. ही योजना म्हणजे छोट्या माणसांना मोठ बनविण्याची योजना आहे.  दरम्यान व्याजदरावरील देण्यात आलेल्या सूटसाठी या वर्षासाठी १५४० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 

मुद्रा योजनेचे तीन प्रकार 

  • शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत ५० हजार रुपयांचे कर्ज मिळू शकतं.
  • किशोर : किशोर श्रेणीत ५० हजार रुपयांपासून ५लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
  • तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअंतर्गंत ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.  लघु उद्योजकांना १०लाखांपर्यंतचे कर्ज या योजनेतून दिले जाते. बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येते.

मुद्रा लोनसाठी आवश्यक बाबी

  • कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
  • कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही.
  • स्वतःचे १० टक्के भाग भांडवलची गरज नाही.
  • ही योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
  • वय १८ वर्षे पूर्ण असले पाहिजे. 
  • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली  कागदपत्रे

  • ओळखीचा पुरावा – मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
  • रहिवासी पुरावा उदा – लाईट बिल, घर पावती.
  • आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
  • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
  • आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
  • अर्जदाराचे २फोटो.
English Summary: government's big decision : two percent discount in interest on 50 thousand rupees Mudra loan Published on: 25 June 2020, 02:38 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters