EPFO ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत 2021-22 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरावर निर्णय घेईल. "कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) सीबीटी बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे ज्यात 2021-22 च्या व्याज दराचा प्रस्ताव आर्थिक वर्षाच्या अखेरीस सूचीबद्ध केला जाईल,असे केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.
EPF व्याजदर 2012-13 पासून सर्वात कमी होता:
एकदा CBT ने आर्थिक वर्षासाठी EPF ठेवींवर व्याजदर ठरवला की, तो संमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला जातो.अर्थ मंत्रालयामार्फत सरकारची मान्यता मिळाल्यानंतरच ईपीएफओ व्याजदर प्रदान करते.मार्च 2020 मध्ये, EPFO ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2018-19 साठी प्रदान केलेल्या 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला होता.2019-20 साठी प्रदान केलेला EPF व्याजदर 2012-13 पासून सर्वात कमी होता, जेव्हा तो 8.5 टक्क्यांवर आणला गेला.
EPFO ही ग्राहकांची संख्या आणि केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणात जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे. सध्या ते तिच्या सदस्यांशी संबंधित 24.77 कोटी खाती सांभाळते.EPFO ने 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याजदर दिला होता. 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्क्यांनी किंचित जास्त होता.2013-14 तसेच 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याजदर दिला होता, जो 2012-13 च्या 8.5 टक्क्यांपेक्षा जास्त होता. 2011-12 मध्ये भविष्य निर्वाह निधीवर 8.25 टक्के व्याजदर होता.
EPFO 2021-22 साठी 2020-21 साठी ठरवल्याप्रमाणे 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवेल का, असे विचारले असता, CBT चे प्रमुख असलेले यादव म्हणाले की, आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारावर निर्णय घेतला जाईल.2020-21 साठी EPF ठेवींवरील 8.5 टक्के व्याजदराचा निर्णय सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने (CBT) मार्च 2021 मध्ये घेतला होता.
Share your comments