1. इतर बातम्या

वन्य प्राण्यांपासून पिकांचे, फळझाडांचे होणारे नुकसान आणि मनुष्य व पाळीव प्राणी यांची होणारी हानीसाठी शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई

शेतकरी म्हटलं की अनंत प्रश्न आणि हातात नसलेली उत्तरे देत निर्धाराने शेती व्यवसाय करणारा होय. पीक उत्पादनावर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस, पावसातील मोठा खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, बाजार भावातील चढ उतार अशा असंख्य बाबींचा परिणाम होत असतो. त्याच बरोबर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्यांना स्वतःला, कुटुंबाला, त्यांच्या पाळीव प्राण्यांना, पिकांना, फळझाडांना त्रास सोसावा लागतो. विविध आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा विपरीत परिस्थितीत वन्य प्राण्यापासून होणाऱ्या हानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाते.

KJ Staff
KJ Staff
Wild Animals

Wild Animals

शेतकरी म्हटलं की अनंत प्रश्न आणि हातात नसलेली उत्तरे देत निर्धाराने शेती व्यवसाय करणारा होय. पीक उत्पादनावर दुष्काळ, अतिवृष्टीगारपीटअवेळी पाऊस,पावसातील मोठा खंडकीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, बाजार भावातील चढ उतार अशा असंख्य बाबींचा परिणाम होत असतो. त्याच बरोबर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्यांना स्वतःला, कुटुंबाला, त्यांच्या पाळीव प्राण्यांनापिकांनाफळझाडांना त्रास सोसावा लागतो. विविध आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा विपरीत परिस्थितीत वन्य प्राण्यापासून होणाऱ्या हानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाते.

अ) पिकांची नुकसान भरपाई:

राज्यातील रानडुक्कर, हरिण (सारंग व कुरंग), रानगवा, रोही (निलगाय), माकड तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांच्या नुकसानीची भरपाई पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

बाब

द्यावयाची आर्थिक मदत

नुकसान रु.२०००/- पर्यंत झाल्यास

पूर्ण परंतु किमान रु.५००/-

नुकसान रु.२,००१/- ते १०,०००/-  पर्यंत झाल्यास

रु.२०००/- अधिक त्यापेक्षा जास्तीच्या नुकसानीच्या ५०% रक्कम (रु.६,०००/- चे कमाल मर्यादेत)

नुकसान रु.१०,०००/- पेक्षा जास्त झाल्यास

रु.६०००/- अधिक रुपये १०,०००/-  पेक्षा जास्त नुकसानीच्या ३०% रक्कम (रुपये १५,०००/- चे कमाल मर्यादेत)

ऊस

रु.४०० प्रति मे. टन


त्याचप्रमाणे वन्यहत्ती व रानगवे यांनी फळबागांच्या केलेल्या नुकसानीबाबत भरपाई पुढीलप्रमाणे आहे.

बाब

द्यावयाची आर्थिक मदत

फळझाडे

नारळ

रु.२,०००/- प्रति झाड

सुपारी

रु.१,२००/- प्रति झाड

कलमी आंबा

रु.१,६००/- प्रति झाड

केळी

रु.४८/- प्रति झाड

इतर फळझाडे

रु.२००/- प्रति झाड

हेही वाचा:संत्रा पिकावरील डिंक्या ,पायकुज व मुळकुज रोगाचे व्यवस्थापन

अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती :

  • पिक नुकसानीची तक्रार अधिकारक्षेत्र असलेले नजीकचे वनरक्षक, वनपाल अगर वन परिक्षेत्र अधिकारी यांचेपैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसात करावी.
  • त्याची शहानिशा करून संबंधित वनपाल, सरपंच, ग्रामसेवक/तलाठी व कृषी अधिकारी या चार सदस्यांच्या समितीमार्फत पंचनामा करणे, नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे, या बाबी पार पडल्या जातील.
  • ऊस पिकाचे नुकसानीसाठी रु.४०० प्रति मे.टन असे वजनावर आधारित न ठेवता ज्या तालुक्यामध्ये ऊस पिकाचे नुकसान होईल त्या तालुक्याच्या मागील ८ वर्षाची कृषि विभागाने काढलेल्या उसाच्या उत्पादकतेवरून सरासरी उत्पादकता काढून त्यानुसार ऊस पिकाची नुकसान भरपाई क्षेत्रावर आधारित उत्पादकतेनुसार (प्रति मे.टन रु.४००/- प्रमाणे गणना करून) देण्यात येते.
  • ज्या व्यक्तींना पिक संरक्षणार्थ बंदूक परवाने देण्यात आले आहेत अशा व्यक्तींच्या शेतीची नुकसान भरपाई विहित दराने वन्यहत्ती किंवा इतर वन्यप्राणी यांना इजा किंवा त्यांची शिकार संबंधीताकडून झाली नसल्यास अनुज्ञेय राहील.
  • ही मदत प्रती हेक्टरी न राहता प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीवर अवलंबून राहिल.

खालील प्रकरणे नुकसान भरपाईसाठी अपात्र राहतील.

  • वनजमिनीवर अतिक्रमनाद्वारे करण्यात येणारी शेती.
  • भारतीय वन अधिनियम किंवा वन्यजीव (संरक्षण) अधिनियमांतर्गत ज्यांचे विरुध्द गुन्हा नोंदविला गेला आहे अशा व्यक्तीची शेती.
  • ज्या कुटुंबाची ४ पेक्षा अधिक गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्या कुटुंबाची शेती.
  • मागील एक महिन्याचे काळात वन्यप्राण्यांच्या शिकारीची घटना झालेली गावे.

ब) मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे अर्थ सहाय्य :

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास पुढीलप्रमाणे अर्थ सहाय्य देण्यात येते.

अक्र

तपशिल

देय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम

व्यक्ती मृत झाल्यास

रुपये १०,००,०००/- (रु. दहा लाख फक्त)

व्यक्ती कायम अपंग झाल्यास

रुपये ५,००,०००/- (रु. पाच लाख फक्त)

व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास

रुपये १,२५,०००/- (रु. एक लाख पंचवीस हजार फक्त)

व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास

औषधोपचारासाठी येणारा खर्च . मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये २०,०००/- (रु. वीस हजार फक्त) प्रती व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.

 

  • वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी रु. ३,००,०००/- (रु. तीन लक्ष फक्त) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रु. ७,००,०००/- (रु. सात लक्ष फक्त) त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम (फिक्स डिपोजीट) जमा करण्यात येते.
  • वन्यप्राणी हल्ल्यामुळे व्यक्ती मृत/अपंग/जखमी झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती.
  • सदर व्यक्तीने वन्यजीव (संरक्षण)अधिनियम.१९७२ च्या तरतुदींचा भंग केलेला नसावा.
  • सदर व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईक/मित्र मंडळी यांनी हल्ला झाल्यापासून ४८ तासाच्या आत नजीकच्या वन अधिकारी /कर्मचाऱ्यास कळवावे.
  • सदर बाबत विहित पंचनामा,पोस्ट मार्टम अहवाल प्राप्त होऊन मदत देण्याची कार्यवाही केली जाते.

क) पशुधन मृत्यू/अपंग/जखमी प्रकरणी ग्राह्य नुकसान भरपाई :

अ.क्र.

पशुधनाचे(पाळीव प्राण्याचे) नाव

देय असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम

गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास

बाजार भाव किंमतीच्या ७५% किंवा रु. ४०,०००/-(रु. चाळीस हजार फक्त) या पैकी कमी असणारी रक्कम.

मेंढी, बकरी व इतर पशुधन* यांचा मृत्यू झाल्यास {* वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम २(१८-अ) प्रमाणे }

बाजार भाव किमतीच्या ७५% किंवा रु. १०,०००/- (रु. दहा हजार फक्त) या पैकी कमी असणारी रक्कम.

गाय, म्हैस, बैल, या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास

बाजार भाव किमतीच्या ५०% किंवा रु. १२,०००/- (रु. बारा हजार फक्त) या पैकी कमी असणारी रक्कम.

गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास

औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करणेत यावा. देय रक्कम मर्यादा बाजार भावाचे २५% किंवा रु. ४०००/- (रु. चार हजार फक्त) प्रति जनावर यापैकी कमी असणारी रक्कम, उक्त नुकसान भरपाई पशुवैद्यकीय अधिकारयाने दिलेल्या प्रमाणपत्राचे आधारे देण्यात यावी.

 

  • वन्यप्राणी हल्ल्यामुळे पशुधनाचा मृत/अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या अटी व शर्ती.
  • याबाबत संबंधितांनी घटना घडल्यानंतर जनावराच्या मालकाने ४८ तासाच्या आत जवळील वन विभागास खबर देणे आवश्यक आहे.
  • मृत जनावराचे शव पंचनामा होई पर्यन्त हलवू नये .ज्या ठिकाणी जनावराचा मृत्यू झाला, त्या ठिकाणापासून १० कि .मी. भागात कोणत्याही वन्य प्राण्याचा ६ दिवसापर्यंत विष देऊन मृत्यू झालेला नसावा.  

हेही वाचा:पावर विडर तण काढण्यासाठी आहे एक महत्वाची मशीन

ड) गिधाडांद्वारे होणाऱ्या नारळांची नुकसान भरपाई :

गिधाडांद्वारे प्रजननासाठी नारळाच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने घरट्यामधील गिधाडाच्या विष्ठेमुळे नारळाचे उत्पन्न घटते व शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी अशा झाडांवर असलेली घरटी नष्ट करतात व पर्यायाने त्यामुळे गिधाडाची अंडी-पिल्ले नष्ट होतात. गिधाडांची घरटी असलेल्या नारळ झाडासाठी प्रती हंगाम पुढील प्रमाणे व खालील अटींवर नुकसान भरपाई देण्यात येते.

  • नारळाचे मागील हंगामातील प्रति झाड उत्पादन संबंधित कृषि अधिकाऱ्याकडून निश्चित करतात. त्यानुसार ज्या झाडावर गिधाडाचे घरटे असेल त्या झाडाच्या उत्पादनात चालू हंगामात झालेली घट विचारात घेऊन प्रति नारळ रु. ७/- प्रमाणे नुकसान भरपाई परिगणित करण्यात येते.
  • देण्यात येणारी नुकसान भरपाई प्रति हंगाम प्रति झाड रु. ४००/- च्या मर्यादेत देण्यात येते.
  • गिधाडाचे घरटे नारळाचे झाडावर असल्याचे आढळल्यावर शेतमालकाने तसे स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालयास कळवावे. सदर बाबीची वन अधिकाऱ्याने खात्री केल्यावर नुकसान भरपाई देण्यात येते.
  • गिधाडांच्या विणीचा हंगाम संपेपर्यंत शेतमालकाने घरट्यास संरक्षण द्यावे. याबाबत पाहणी करून खात्री झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येते.

अश्या प्रकारे वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्याचे होणारे आर्थिक नुकसान स्थितीत त्यांना शासना मार्फत विविध बाबींसाठी मदत देण्यात येते. शासन वेळोवेळी देण्यात येणारी मदत व त्या साठीच्या अटी शर्ती या मध्ये सुधारणा करत असते. तरी या बाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

श्री. विनयकुमार आवटे
(अधीक्षक कृषी अधिकारी, मनरेगा, पुणे विभाग, पुणे)

English Summary: Government Compensation for Losses of Crops, Fruit Trees, Humans & Livestock from Wild Animals Published on: 19 July 2018, 04:31 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters