1. इतर बातम्या

आता झंझट मिटली! 'आरटीओ ऑफिस'ची कामे आता होतील अगदी घरी बसून, वाचा सविस्तर माहिती

सरकारी कामे म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ती वेगवेगळ्या कागदपत्राची पुर्तता,तासन्तास रांगेत उभे राहणे आणि तरीदेखील आपले काम वेळेवर होईल याची कुठलीही शाश्वती नसणे इत्यादी गोष्टी लगेच डोळ्यासमोर येतात. कुठलेही सरकारी कार्यालयातील कामाच्या संबंधित हाच अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. अगदी छोट्या छोट्या कामांसाठी देखील खूप हेलपाटे मारावे लागतात व या सगळ्या समस्यामध्ये आरटीओ ऑफिस देखील मागे नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
now get rto service by online

now get rto service by online

सरकारी कामे म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ती वेगवेगळ्या कागदपत्राची पुर्तता,तासन्तास रांगेत उभे राहणे आणि तरीदेखील आपले काम वेळेवर होईल याची कुठलीही शाश्वती नसणे इत्यादी गोष्टी लगेच डोळ्यासमोर येतात. कुठलेही सरकारी कार्यालयातील कामाच्या संबंधित हाच अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. अगदी छोट्या छोट्या कामांसाठी देखील खूप हेलपाटे मारावे लागतात व या सगळ्या समस्यामध्ये आरटीओ ऑफिस देखील मागे नाही.

आपल्याला माहित आहेच कि आरटीओ ऑफिस मध्ये देखील अनेक प्रकारचे कामांसाठी रांगा लागलेल्या असतात. परंतु जर तुमचे काही आरटीओ ऑफिसच्या संबंधित काही काम असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नसून आता राज्य परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आरटीओ ऑफिसची संबंधित जवळजवळ 58 सेवा  ऑनलाइन केले आहेत.

नक्की वाचा:Land Record: भारीच की! फक्त 100 रुपयांत आजोबा आणि पंजोबाच्या काळातील जमीन करा नावावर; जाणून घ्या...

 आरटीओ ऑफिसच्या 58 सेवा आता ऑनलाईन

 राज्य परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 58 सेवा आता ऑनलाइन केल्या असून यामध्ये वाहन परवान्याची संबंधित अनेक सेवांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे व एवढेच नाही तर यासंबंधीची अधिसूचना देखील मंत्रालयाने जाहीर केले आहे.

यामध्ये कंडक्टर लायसन, वाहन परवाना तसेच मालकी हस्तांतरण यासारख्या सेवांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला असून आधार अथेंतिकेशनच्या माध्यमातून नागरिक आता घरी बसून या सेवांचा फायदा घेऊ शकणार आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे कार्यालयात वारंवार जाण्यासाठी लागणारा वेळ आणि होणारा मनस्ताप वाचणार आहे.

नक्की वाचा:Pesticides: कीटकनाशक कंपन्यांच्या जाळ्यात अडकले शेतकरी; भाजीपाला आणि फळे निर्यातीवर प्रभाव

कुठल्या सेवांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे?

 यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कॉन्टॅकलेस आणि फेसलेस या सुविधा या माध्यमातून मिळणार असून शिकाऊ परवान्यासाठी अर्ज तसेच शिकाऊ परवान्यात पत्ता किंवा नाव किंवा फोटो बदलणे,डुबलीकेट लायसन्ससाठी अर्ज करणे इत्यादी सेवांचा समावेश करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना तसेच कंडक्टर लायसन्समध्ये पत्ता बदलणे यासारख्या कामांसाठी आता आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

समजा एखाद्या व्यक्तीकडे जर आधार कार्ड नसेल तर अशी व्यक्ती स्वतः अर्ज करून या सेवांचा लाभ घेऊ शकतात परंतु यासाठी त्यांना इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर या सेवा पूर्वीदेखील ऑनलाईन होत्या परंतु कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांना आरटीओ ऑफिस मध्ये जावे लागत होते.परंतु आता यामध्ये सरकारने कायमचा बदल केला आहे.

नक्की वाचा:SCO Summit 2022: पंतप्रधान मोदींनी अन्न सुरक्षेचा मुद्दा केला उपस्थित; मोदी म्हणाले...

English Summary: goverment taking decision about 58 service of rto office related do by online Published on: 18 September 2022, 01:05 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters