पेंशन धारकांसाठी केंद्र सरकारकडून अत्यंत सुखद बातमी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक पेशंन धारकांना त्याचा फायदा होणार आहे.
ही महत्वाची बातमी म्हणजे आता केंद्र सरकारकडून पेंशन धारकांसाठी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची अंतिम मुदततीची तारीख कळवण्यात आली असून ती अंतिम तारीख आता 31 डिसेंबर अशी आहे.
याबाबतची माहिती देताना केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्र सरकारची पेन्शन धारक आता त्यांचे जीवन प्रमाणपत्र हे 31 डिसेंबर पर्यंत सादर करू शकतात.
तात. या पूर्वीची मुदतीची तारीख 30 नोव्हेंबर होती असे त्यांनी सांगितले. हा महत्वाचा निर्णय करुणा महामारी च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून सरकारने ही सुट देण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्र सरकार कडून पेन्शन मिळणारे संबंधित लोक हे त्यांचे जीवन पत्र बँकेच्या शाखांमध्ये जाऊन स्वतः किंवा डिजिटल पद्धतीने 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करू शकतात.
जे पेन्शन घेणारे लोक आहे त्यांना दरवर्षी 30 नोव्हेंबर पर्यंत संबंधित प्रमाण पत्र त्यांच्या बँकेच्या शाखेत जाऊन सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र सादर करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे पेन्शन धारकांचा मृत्यूनंतर या पेन्शन योजनेचा लाभ त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अयोग्यरीत्या मिळू नये हा आहे.
Share your comments