1. इतर बातम्या

खूशखबर ! उद्या तुमच्या खात्यात येणार पैसे; ऑनलाईन तपासा आपले नाव

देशातील १० कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रूपयांचा सहावा हप्ता उद्या जमा होणार आहे. केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे १ ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वितरित केला जाणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशातील १० कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रूपयांचा सहावा हप्ता उद्या जमा होणार आहे. केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे १ ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वितरित केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या तिसऱ्या वर्षातील हा दुसरा हप्ता असणार आहे. यापूर्वी सरकारने डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या वर्षात ४.५ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला होता. तर आर्थिक वर्ष एप्रिल २०१९ – मार्च २०२० मध्ये ८ कोटी ५२ हजार शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. यानंतर आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी एप्रिल ते जुलै साठी ८ कोटी ५२ लाख ९८ हजार ४०९ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रूपयांचा लाभ दिला आहे.

जर तुम्ही २०२० – २१ या आर्थिक वर्षात नोंदणी केली असेल तर तुम्हाला येत्या ऑगस्टमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू शकतो. तर काहींना एप्रिल ते जुलै दरम्यान हा हप्ता मिळाला आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव असल्याची खात्री करून घेणे गरेजेचे आहे. यासाठी तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फार्मर्स कॉर्नरवर जाऊन https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या ठिकाणी माहिती घेऊ शकता. 

 


तुमच्या अर्जातील चुका अशा पद्धीतीने दुरुस्त करा

PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळ (https://pmkisan.gov.in/) यावर जा. येथे फार्मर कॉर्नरच्या आत जाऊन Edit Aadhaar Details या पर्ययावर क्लिक करा. येथे आपला आधार नंबर नोंदवा. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. आता जर आपले नाव चुकीचे असेल तर ते ठीक करा. जर अजून काही दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभगाशी संपर्क करावा. जर यानंतरही आपल्या खात्यात पैसे आले नाही तर आपण केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा आणि आपली तक्रार नोंदवा. या नंबर आपली तक्रार ऐकली गेली नसेल तर आपण मंत्रालयाच्या (011-23381092) नंबरवर संपर्क साधावा.

 ऑनलाईन कसे पाहणार आपले नाव -

यासाठी आपण pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे. आपण या योजनेसाठी अर्ज करु इच्छित आहात तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. दरम्यान सरकारने पंतप्रधान किसान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहेत. जर आपल्याला आपले नाव पाहायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची यादी आपण येथे पाहू शकता.

English Summary: Good news for farmers! The money will be in your account tomorrow, check your name online Published on: 31 July 2020, 04:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters