केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्वाची भेट दिली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वेळेचा विचार केला तर सरकारने मार्चमध्ये डीए वाढवला होता.
तो एक जानेवारी दोन हजार बावीस पासून लागू झाला. मार्चमध्ये सरकारने डीए मध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. 31 टक्क्यांवरून 34% केली होती व आता चार टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर तो आता 38 टक्के होणार आहे. यामुळे आता देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
नक्की वाचा:आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ
महागाई भत्त्याची ही वाढलेली रक्कम जुलै पासून लागू होणार असून मागील महिन्याची थकबाकी देखील कर्मचार्यांना मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कामगारांचे पगार 6840 ते 27 हजार 312 रुपयांपर्यंत वाढणार आहेत.
कारण या वर्षी मार्चमध्ये डीए मध्ये सुधारणा केली होती, जी नंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या तीन टक्क्यांनी वाढून 34 टक्के झाली. आता चार टक्के वाढझाल्याने महागाईभत्ता सध्याच्या 34 टक्क्यांवरून 38 टक्के झाला आहे.
Share your comments