Gold Silver Price: देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. नवरात्रीनंतर (Navratri) दसरा आणि दिवाळी सुरु होणार आहे. तर यामध्ये अनेकजण सोने (Gold) किंवा चांदीचे (Silver) दागिने खरेदी करत असतात. तुम्हीही या दिवसांमध्ये सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोने आणि चांदी त्यांच्या उच्चांक दारापासून (High Rates) स्वस्त मिळत आहे.
सणासुदीच्या काळात सराफा बाजारात (Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात आणखी घट झाल्याची खूशखबर ग्राहकांसाठी आहे. ही खरेदीची उत्तम संधी आहे. आज 22 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 45,800 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,970 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीचा प्रति किलो सरासरी भाव 55,400 रुपयांवर गेला आहे.
सोने 6600 आणि चांदी 24500 पर्यंत स्वस्त होत आहे
सोन्याचा भाव सध्या 6671 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 24589 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार; कारण...
प्रमुख शहरांमध्ये प्रति दहा ग्रॅम किंमत
चेन्नई: रु 46,100 (22 कॅरेट), 50,290 (24 कॅरेट)
मुंबई : 45,800 (22 कॅरेट), 49,970 (24 कॅरेट)
दिल्ली : 45,950 (22 कॅरेट), 50,130 (24 कॅरेट)
कोलकाता : 45,800 (22 कॅरेट), 49,970 (24 कॅरेट)
जयपूर : 45,950 (22 कॅरेट), 50,130 (24 कॅरेट)
लखनौ : 45,950 (22 कॅरेट), 50,130 (24 कॅरेट)
पाटणा : 45,830 (22 कॅरेट), 50,000 (24 कॅरेट)
सुरत : 46,850 (22 कॅरेट), 50,020 (24 कॅरेट)
१ ऑक्टोबरनंतर सर्वसामान्य ते शेतकऱ्यांना बसणार महागाईचा फटका! सीएनजी गॅस आणि खतांच्या किमती वाढणार
चांदीची किंमत
चांदीची सरासरी किंमत 55,400 रुपये प्रति किलो आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौ इत्यादी शहरांमध्ये प्रति किलो 55,400 किंमत आहे. तर चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इत्यादी शहरांमध्ये किंमत 60,700 रुपये आहे. असा फरक चांदीच्या दरात कायम आहे.
लक्ष द्या
वर दिलेले सोने आणि चांदीचे भाव सूचक आहेत. यात जीएसटी किंवा इतर कोणत्याही कराचा समावेश नाही. निश्चित किंमतीसाठी तुमच्या स्थानिक सराफा किंवा ज्वेलरशी संपर्क साधा. ज्वेलर्स किंवा उत्पादक सोन्याच्या दागिन्यांसाठी वेगळा मेकिंग चार्ज आकारतात.
खरेदी करताना ही माहिती जरूर घ्या. मेकिंग चार्ज सर्व ज्वेलरी उत्पादकांसाठी बदलतो. सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कायद्याने बंधनकारक आहे. खरेदी करताना हॉलमार्किंगची (Hallmark) खात्री करा. हॉलमार्किंग गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी आहे.
महत्वाच्या बातम्या:
आनंद अँग्रो केअरच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा
महाराष्ट्रात SBI मध्ये 747 जागांची भरती तर पूर्ण भारतात 5000 हून अधिक जागा; असा करा अर्ज
Share your comments