Gold Rate: रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा भडका उडाला आहे. कारण आंतराराष्ट्रीय बाजारातील (International Market) किमतीच्या अस्थिरतेमुळे महागाईचा आगडोंब उठला आहे. त्यातच इंधनाचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोने आणि चांदी त्यांच्या उच्चांक दरापासून (High rate) स्वस्त मिळत आहेत.
तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी (Buy jewelry) करायचे असतील तर तुमच्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. कारण सोने 4700 रुपयांनी तर चांदी 24900 रुपयांनी उच्चांक दरापासून स्वस्त मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे.
मंगळवारी सोन्याचा भाव किरकोळ 25 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागला आणि तो 51421 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर सोमवारी व्यवहाराच्या दिवशी सोने 406 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 51396 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
तर चांदी 110 रुपयांनी स्वस्त होऊन 55000 रुपये किलोवर बंद झाली. तर सोमवारी व्यवहाराच्या दिवशी चांदी 771 रुपयांनी स्वस्त होऊन 55110 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही वारंवार होणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता. यावर तुम्हाला दररोज नवीन दर पाहता येतील.
सोने 4700 आणि चांदी 24900 पर्यंत उच्चांक दरापासून स्वस्त
रशिया युक्रेन युद्धादरम्यान सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. सोने सध्या 4779 रुपये प्रति 10 ग्रॅम त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
Weekly Horoscope: हा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा ठरेल? वाचा तुमचे राशीभविष्य
त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 24980 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे मंगळवारी 24 कॅरेट सोने 25 रुपयांनी महाग होऊन 51421 रुपयांना झाले, 23 कॅरेट सोने 25 रुपयांनी महाग होऊन 51215 रुपयांना झाले आहे, 22 कॅरेट सोने 23 रुपयांनी महाग होऊन, 47102 रुपयांना झाले आहे, 18 कॅरेट सोने 50 रुपयांनी महाग होऊन 38566 रुपयांना झाले आहे आणि 14 कॅरेट सोने 14 रुपयांनी महाग होऊन 30081 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
महत्वाच्या बातम्या:
Weather Update: पावसाने तोडले 29 वर्षाचे रेकॉर्ड; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस
Sanen Goat: जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी ठरतेय अव्वल; पालनातून शेतकऱ्यांना मिळणार चांगले उत्पादन
Share your comments