Gold Price Update: दिवाळीच्या (Diwali) सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. देशात दिवाळी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या शुभमुहूर्तावर अनेकजण सोने आणि चांदीचे (Silver) दागिने खरेदी करत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold) आणि चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळत आहे.
मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी या व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव ५१ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ५६ हजार रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. सध्या सोन्याचा दर 5800 रुपयांनी तर चांदी 24000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
मंगळवारी सोने 68 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 50362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने प्रति दहा ग्रॅम 8 रुपयांनी स्वस्त होऊन 50430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
तर चांदी 367 रुपयांनी महागून 56010 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 399 रुपयांनी स्वस्त होऊन 55643 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार गोड बातमी! आज या पिकांची किमान आधारभूत किंमत वाढणार
सोने 5800 आणि चांदी 24000 पर्यंत स्वस्त होत आहे
सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5838 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 23970 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे मंगळवारी 24 कॅरेट सोने 68 रुपयांनी स्वस्त होऊन 50362 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 68 रुपयांनी स्वस्त होऊन 50160 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 62 रुपयांनी स्वस्त होऊन 46132 रुपयांनी, 18 कॅरेट सोने 51 रुपयांनी स्वस्त होऊन 37772 रुपये झाले. आणि 14 कॅरेट सोने 40 रुपयांनी स्वस्त होऊन 29462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
Edible Oil: सर्वसामान्यांची दिवाळी होणार कडू! खाद्यतेलाच्या किमती पुन्हा देणार दणका
हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा
सोने खरेदी करताना ग्राहकांनी त्याच्या गुणवत्तेची काळजी घेणे आवश्यक आहे. हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोन्याचे दागिने खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी आहे जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क्स दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.
महत्वाच्या बातम्या:
Nano Urea: नॅनो युरियाचा शेतकऱ्यांना किती फायदा? थेट पंतप्रधान मोदींनीच सांगितलं
केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दुहेरी दिवाळी भेट! काल खात्यात पैसे तर आज पिकांच्या हमीभावात वाढ
Share your comments