Gold Price Update: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तुम्हीही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदी (Silver) त्यांच्या उच्चांकी दरापासून स्वस्त मिळत आहे. त्यातच आता दिवाळीमध्ये अनेक जण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत असतात.
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. पण, हो याच्या उलट आहे. सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव कमी होत आहेत. शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजीही भारतीय सराफा बाजारात (Bullion Market) सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) सोन्याच्या दरात मंदी आली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात 0.22 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी एमसीएक्सवर आज चांदीचा दर 0.47 टक्क्यांनी घसरला आहे.
या व्यापार आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोने 8 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीच्या दरात 661 रुपयांनी वाढ झाली. यानंतर सोन्याचा भाव 50300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 56300 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. सध्या सोन्याचा भाव सुमारे ६००० रुपयांनी तर चांदी २३७०० रुपयांनी स्वस्त होत आहे.
दूध उत्पादकानो द्या लक्ष! जनावरांच्या आहारात या 2 गोष्टींचा करा समावेश दुधात होईल भरघोस वाढ
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे गुरुवारी 24 कॅरेट सोने 8 रुपयांनी स्वस्त होऊन 50228 रुपयांना झाले, 23 कॅरेट सोने 8 रुपयांनी स्वस्त होऊन 50027 रुपयांना झाले, 22 कॅरेट सोने 7 रुपयांनी स्वस्त होऊन 46009 रुपयांना झाले, 18 कॅरेट सोने 6 रुपयांनी स्वस्त होऊन 37671 रुपयांना झाले, आणि 14 कॅरेट सोने 5 रुपयांनी स्वस्त होऊन 29383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
आतापर्यंतच्या उच्चांकावरून सोने सुमारे 6000 रुपयांनी तर चांदी 23700 रुपयांनी स्वस्त होत आहे
सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5972 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 23713 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
एकच नंबर! शेतामध्ये बसवा हे आधुनिक उपकरण; हवामान आणि कीड ओळखून करेल मोबाईलवर अलर्ट
मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या:
कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! DA वाढीसह आणखी एक आनंदाची बातमी, आता प्रमोशनही होणार...
कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! DA वाढीसह आणखी एक आनंदाची बातमी, आता प्रमोशनही होणार...
Share your comments