1. इतर बातम्या

Gold price today: सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या १४ ते २४ कॅरेटचे नवे दर...

Gold price today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत होती. मात्र आता दुर्गापूजेच्या अगोदर सोन्या चांदीच्या दारात वाढ होताना दिसत आहे. मात्र ग्राहकांना सोने आणि चांदी खरेदी करण्याची अजूनही संधी आहे. कारण सोने आणि चांदी उच्चांकी दरापेक्षा स्वस्त मिळत आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Gold-Silver

Gold-Silver

Gold price today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold) दरात घसरण पाहायला मिळत होती. मात्र आता दुर्गापूजेच्या अगोदर सोन्या चांदीच्या दरात वाढ (rate hike) होताना दिसत आहे. मात्र ग्राहकांना सोने आणि चांदी (Silver) खरेदी करण्याची अजूनही संधी आहे. कारण सोने आणि चांदी उच्चांकी दरापेक्षा स्वस्त मिळत आहे.

जागतिक बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) आज सोन्या-चांदीच्या किमती वाढताना दिसत आहेत. एमसीएक्स गोल्ड डिसेंबर फ्युचर्स 0.22 टक्के किंवा 112 रुपयांच्या वाढीसह 51,272 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहेत.

चांदीचा डिसेंबर फ्युचर्स 1.11 टक्क्यांनी म्हणजेच 676 रुपयांनी 61,587 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहे. सोमवारी सोन्याचा डिसेंबर फ्युचर्स 51,160 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. चांदीचा डिसेंबर फ्युचर्स 60,911 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

भारीच की! लिंबाच्या एका झाडापासून मिळणार ६० किलो उत्पन्न; बाजारात आली नवीन जात

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market), स्पॉट गोल्ड 2.11 टक्के किंवा $35.08 च्या मजबूतीसह $ 1699.38 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, चांदी 9.29 टक्क्यांनी वाढली आहे, म्हणजे $ 1.77. चांदी 20.88 डॉलर प्रति औंस आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत

अशाप्रकारे सोमवारी 24 कॅरेट सोने 85 रुपयांनी महागून 50387 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 84 रुपयांनी महाग होऊन 50185 रुपये झाले, 22 कॅरेट सोने 78 रुपयांनी महाग होऊन 46155 रुपये झाले, 18 कॅरेट सोने 63 रुपयांनी महागून 37790 रुपये झाले आहे. 14 कॅरेट सोने 49 रुपयांनी महाग होऊन 29476 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

दिलासादायक! 72 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण; लम्पी त्वचा रोगाला रोखण्यासाठी राज्य सरकारचा कसून प्रयत्न

सोने 5800 आणि चांदी 23600 पर्यंत स्वस्त होत आहे

सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5813 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 22663 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.

महत्वाच्या बातम्या:
कच्च्या तेलाच्या किमती 85 डॉलरच्या आसपास; फटाफट जाणून घ्या पेट्रोल डिझेल स्वस्त झाले की महाग?
राज्यातील शेतकरी चारही बाजूने संकटात! मुसळधार पावसाने फुलशेती उध्वस्त; शेतकरी अडचणीत

English Summary: Gold price today: A big increase in the price of gold and silver! Know the new rates of 14 to 24 carats Published on: 04 October 2022, 10:12 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters