Gold Price: वाढत्या महागाईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत अस्थिरता पाहायला मिळत आहे. कधी सोने आणि चांदीच्या (Silver) दरात घसरण पाहायला मिळत आहे तर कधी भाव वाढल्याचे दिसत आहे. सणासुदीच्या काळात अनेकजण सोने (Gold) आणि चांदी खरेदी करत असतात. तर काही जण गुंतवणूक (Investment) म्हणून सोने आणि चांदी खरेदी करत असतात.
वाढत्या महागाईच्या (inflation) काळातही सोन्याच्या दरात झालेली घसरण नवे संकेत देत आहे. लोकांचा कल आता सोन्यात गुंतवणुकीकडे मागे पडत आहे. यामुळेच एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा फ्युचर्स ट्रेडिंग ५१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही सुमारे २ टक्क्यांनी घसरण झाली आहे. यापुढेही सोन्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
बुधवारी सोन्याचा भाव 19 रुपयांनी महागला आणि तो 50755 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. तर मंगळवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 384 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 50736 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
तर चांदी 510 रुपयांनी स्वस्त होऊन 57104 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर मंगळवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 1335 रुपयांनी स्वस्त होऊन 57614 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
पावसामुळे पिके उध्वस्त झाली, नो टेन्शन! शेतकऱ्यांनो लगेच करा हे काम; मिळेल नुकसान भरपाई
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशा प्रकारे बुधवारी 24 कॅरेट सोने 19 रुपयांनी महाग होऊन 50755 रुपयांना झाले, 23 कॅरेट सोने 19 रुपयांनी महाग होऊन 50552 रुपयांना झाले, 22 कॅरेट सोने 18 रुपयांनी महाग होऊन 46492 रुपयांना झाले, 18 कॅरेट सोने 14 रुपयांनी महाग होऊन 38066 रुपयांना झाले आणि 14 कॅरेट सोने 11 रुपयांनी महाग होऊन29692 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
उच्चांकापेक्षा सोने 5400 आणि चांदी 22000 पर्यंत स्वस्त होत आहे
सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5445 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 22876 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
कर्मचाऱ्यांची लॉटरी! DA वाढीनंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आणखी एक मोठी भेट
मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
परदेशात सोन्याच्या मागणीत घट
केवळ भारतातच नाही तर परदेशातील गुंतवणूकदार सोन्याकडे पाठ फिरवत आहेत. अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेसारख्या देशांमध्ये महागाई वाढल्यानंतरही लोक सोन्यात गुंतवणूक करण्यापासून अंतर राखत आहेत.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ग्रीनबॅक मजबूत झाल्यामुळे आणि प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून दर वाढल्यामुळे सोन्यावर सतत दबाव आहे, तर यूएस फेडने केलेल्या दरवाढीमुळे जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. मजबूत डॉलरमुळे सोने खरेदी करणे अधिक महाग होते, गुंतवणुकीचा कल आणखी कमी होतो.
महत्वाच्या बातम्या:
पुढील ३ दिवस पावसाचे! महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा; अलर्ट जारी
कच्चे तेल उच्चांकापेक्षा 34% स्वस्त; जाणून घ्या पेट्रोल डिझेलच्या दरात काय झाला बदल
Share your comments