सध्याच्या युगामध्ये जीवन विमा पॉलिसी आणि विविध प्रकारच्या आरोग्य विमा उतरवणे खूप गरजेचे झाले आहे. कारण येणारा भविष्यकाळ हा कोणत्या प्रकारचा येईल हे कुणाला सांगता येत नाही. भविष्यकाळ आर्थिक दृष्टीने भक्कम करण्यासाठी प्रत्येक जण विविध ठिकाणी गुंतवणूक करतात किंवा बरेच जण जीवन विमा पॉलिसी घेतात.
परंतु पॉलिसी घेताना निवड करणेदेखील तितकेच गरजेचे असते. त्यामध्ये देखील अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागते. नाहीतर फायदा होण्याऐवजी त्रास होण्याचाच संभव जास्त असतो. या लेखामध्ये आपण जीवन विमा पॉलिसी घेताना कोणत्या प्रमुख गोष्टींकडे लक्ष द्यावे? याबद्दल माहिती घेऊ.
जीवन विमा पॉलिसी घेताना या गोष्टीकडे द्या लक्ष
1- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेव्हा जीवन विमा पॉलिसी घ्याल, तेव्हाच्या पॉलिसीचा इंस्टॉलमेंट साठी तुमची पैशांची बचत किती आहे आणि गुंतवणूक या गोष्टींचा योग्य ताळमेळ साधणे गरजेचे असते.
जेव्हा तुम्ही एखादी पॉलिसीची निवड कराल तेव्हा तुमच्याकडे असलेली तुमची बचत, भविष्यकालीन आयुष्यासाठी करायची गुंतवणूक सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पॉलिसी निवडणे गरजेचे आहे. अजूनही समाजामध्ये बरेच जणांना विमा पॉलिसी च्या बाबतीत हवे तेवढे गंभीर नाहीत.
बरेच जण पुढे बघू आणखी काही वर्षांनी पॉलिसीचा विचार करू असे म्हणत, पॉलिसी घेण्याचे टाळतात. मात्र या ठिकाणीच आपली चूक होते. कारण जसे जसे तुमचे वय वाढते तसा तसा तुमचा पॉलिसीचा प्रीमियम देखील वाढतो. त्यामुळे वय कमी असतानाच पॉलिसी घेणे फायद्याचे ठरते.
2-हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या पॉलिसीची निवड करतो तेव्हा कमीत कमी प्रिमियम आणि जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार जास्त प्रमाणात करतो.असेच प्लान बरेच जन शोधत असतात.
यासाठी बरेच जण टर्म इन्शुरन्स च्या ऐवजी सेविंग कम इन्शुरन्स पॉलिसी चा पर्याय निवडतात. मात्र अशा पॉलिसीमध्ये बचत या ऐवजी फक्त विम्याचा विचार करणे फायद्याचे ठरते असे तज्ञांचे मत आहे. तुम्हाला बचतच करायचे तर त्यासाठी अनेक प्रकारच्या योजना असतात.
यासाठी तुम्ही एफडी, म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी सारखे पर्याय निवडू शकतात. पण तुम्ही जेव्हा विमा पॉलिसी घ्याल तेव्हा फक्त विम्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
3- बरेच जण विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी करण्यासाठी आजारपण आणि वैद्यकीय माहिती लपवतात. तसेच काही व्यसने देखील लपवतात. सोबत कौटुंबिक आणि काही अनुवंशिक आजारांचे देखील माहिती लपवली जाते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉलिसीचा दावा करतात किंवा मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पॉलिसी निवडताना योग्य आणि खरी माहिती देणे आवश्यक आहे.
Share your comments