छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट टाकले जातात. सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आला तर शेतकऱ्यांना बँकेत गेल्यानंतरच कळते आपल्या खात्यात पैसा आला किंवा नाही. याशिवाय पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी केलेला अर्ज हा मंजूर झाला किंवा नाही यांची कल्पनाही लवकर होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.
सरकारने या समस्याची दखल घेत शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती, आणि पैसे मिळालेल्या लाभार्थ्यांची माहिती घरी बसून कळणार आहे. मोबाईल सुविधेमुळे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. इतकेच काय शेतकरी या पीएम किसान मोबाईल एपवरून या योजनेसाठी अर्ज देखील करू शकतील. अगदी सोप्या पद्धतीने शेतकरी या एपच्या मदतीने योजनेसाठी अर्ज करू शकतील.
या एपमध्ये नवीन शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठीही पर्याय दिलेला आहे.
- यानंतर आपण लाभार्थ्यांची स्थिती याची माहिती घेऊ शकतो. (Check Beneficiary Status)
- जर आपल्या आधार कार्डातील काही गोष्टींमध्ये बदल करायचा असेल तर आपण तो बदलही करू शकतो. (Edit Aadhaar details)
- आपल्या नोंदणीची स्थिती आपण तपासून शकतो. (Check Status of self- registered farmers)
- जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण सरकारने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून आपण तक्रार दाखल करु शकतो.
(PM Kisan helpline)
कशाप्रकारे डाऊनलोड करणार पीएम किसान मोबाईल एप (Method to Download PM Kisan Mobile App)
- मोबाईल फोनमधील प्ले स्टोअर या एपमध्ये जा.
- सर्च बॉक्समध्ये पीएम किसान PM-Kisan Mobile app हे टाईप करा. व त्याचा सर्च करा.
- त्यानंतर आपल्याला पीएम किसान मोबाईल एप दिसेल.
- पीएम किसान मोबाईल एप डाऊनलोड करा.
- मोबाईल एपसाठी येथे क्लिक करा.
मोबाईल एपद्वारे योजनेत करा आपली नोंदणी
- मोबाईल एप ओपन करा
- आपला आधार नंबर टाका
- आवश्यक असलेली माहिती भरा.
- माहिती भरल्यानंतर सबमिट करा
मोबाईल एपमधून पीएम किसान योजनेची स्थिती आपल्या कशी जाणून घेणार.
- आपल्या मोबाईल मधील पीएम किसान एप ओपन करा. त्यानंतर लाभार्थी स्थिती Beneficiary status चा शोधा आणि स्थिती जाणून घ्या.
- यानंतर आपला आयडी टाईप निवडा म्हणजे. आधार क्रमांक/ मोबाईल क्रमांक / खाते क्रमांक
- आवश्यक क्रमांक टाकल्यानंतर get details वर क्लिक करा.
- मग आपल्या मोबाईल स्क्रिनवर पीएम किसान योजनेची सर्व माहिती येईल
Share your comments