1. इतर बातम्या

Gautama Buddha : अमृताची शेती

आज बुद्ध पोर्णिमा भगवान बुद्धांचे अनेक प्रसंग विचार आपण ऐकले असतीलच. त्यांनी शांततेचा मार्ग जगाला दिला आहे. भगवान बुद्ध एकदा एका शेतकऱ्याकडे भिक्षा मागायला गेले, तथागत स्वतः भिक्षा मागायला आले असताना तो त्यांना हिणवून म्हणाला "मी शेत नांगरतो आणि मग खातो," तसेच आपणही शेत नांगरून बी पेरून खावे.

Gautama Buddha: The cultivation of nectar

बुद्ध म्हणाले- महाराज ! मी देखील शेतीच करतो, यावर त्या शेतकऱ्याला उत्सुकता वाटली आणि तो म्हणाला बुद्धाला म्हणाला की मी तर आपल्याकडे कधीही नांगर, बैल आणि शेत बघितले नाही. आपण या संदर्भात आपले स्पष्टीकरण द्यावे. त्यावर भगवान बुद्धाने अतिशय शांततेत उत्तर दिले.

भगवान बुद्ध म्हणतात, महाराज ! माझ्या कडे श्रद्धेचे बियाणे आहे, तपश्चर्या रुपी पाऊस आहे, प्रजा स्वरूपात नांगर आहे. पापभयाचे दंड आहे. विचारांची दोरी आहे, स्मृती आणि जागरूकता स्वरूपी नांगराची पैनी आहे. मी वचन आणि कर्मानें राहतो.

मी आपल्या या शेतीला वाया गेलेल्या गवता पासून मुक्त ठेवतो. आनंद रुपी पेरणीची कापणी होई पर्यंत प्रयत्नशील राहतो. अप्रामाद माझे बैल आहे जे कोणतेही अडथळे बघून देखील मागे हटत नाही ते मला माझ्या शांतिस्थळी घेऊन जातात. अशा प्रकारे मी अमृताची शेती करतो.

महत्वाच्या बातम्या
लग्नावरचा खर्च कमी करा आणि शेतीत गुंतवणूक करा: शरद पवार यांचा मोलाचा सल्ला

English Summary: Gautama Buddha: The cultivation of nectar Published on: 16 May 2022, 12:19 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters