ग्रामीण भागात अजूनही विहीर काढायची म्हणले किंवा बोअरवेल काढायचे म्हणले तरी सुद्धा पानाड्याला बोलवून तो त्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने भूभार्गतील पाण्याचा शोध घेतो जे की अनेक ठिकाणी असे पाणी लागले आहे. शेतामध्ये असणारी आपट्याची झाडे किंवा शमीचे झाड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पाणी लागेल असे सांगतो किंवा ज्या ठिकाणी चार झाडांचा संगम झाला आहे त्या ठिकाणी ज्या जागेत ओलसरपणा असेल त्या ठिकाणी विहीर खांदण्यास सांगतो. पानाड्याच्या मागे कोणतेही शास्त्र नसले तरी सुद्धा गावातील लोक त्याच्यावर विश्वास ठेऊन विहीर किंवा बोअरवेल काढण्यास मागे सरत नाहीत. जानेवारी महिन्यात जास्तीत जास्त विहिरी घेतल्या जातात. तसेच कोणत्या भागात पाणी लागेल याचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे.
जानेवारी महिन्यातच का खोदल्या जातात विहीरी?
पावसाळा संपला की येतो तो जानेवारी महिना त्यामुळे जानेवारी महिन्यात जास्त प्रमाणात विहिरी घेतल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्याने त्या भागात जास्त पाणी मुरलेले नसते जे की जास्त खोल वर पाणी गेलेले नसते आणि उथळही नसते त्यामुळे तो भाग खोदणे अगदी सोप्या पद्धतीने होऊन जाते. जमीन नरम झाल्यामुळे आपण सहजपणे विहिर खोदू शकतो. मार्च एप्रिल च्या दरम्यान खोदकाम पूर्ण होते जे की यासाठी कोणतीही वेळ आणि मुहूर्त लागत नाही. मात्र नागरिक शुभ दिवस बघून खोदकाम करतात.
विहीर खोदण्यासाठीची जमिन :-
ज्या ठिकाणी पाण्याचे संचयन झाले असते त्याच ठिकाणी पाणी लागते. जसे की ज्या भागात भेगा असतात किंवा साधे, दगड आणि मुरमाचा स्थर असतो त्या दगडात जास्त प्रमाणात पाणी मुरते. शास्त्रीय पद्धतीने या सर्व भागात पाण्याचे स्टोरेज म्हणले जाते. ज्या भागात पाण्याचा स्टोरेज असतो त्याच ठिकाणी विहीर खोदण्याचे प्रमाण जास्त असते जे की अशा भागात जर आपण विहीर घेतली तर बारमाही पाणी टिकून राहते. ज्या दगडाचा प्रकार नरम तसेच जास्तीत जास्त खोली असणारा असावा या ठिकाणी विहीर खोदावी.
कोणत्या भूस्तर रचनेमध्ये अधिक पाणी लागते?
ज्या ठिकाणी मुरमाड खडक जास्त प्रमाणात खोलवर असेल त्या भागात जास्त प्रमाणात पाणी लागते. मात्र ज्या ठिकाणी कठीण पाषाण असेल त्या ठिकाणी पाणी लागत नाही. ज्या ठिकाणी काळ्या मातीचा थर असेल त्या ठिकाणी भुजलपुनर्भरही कमी होते त्यामुळे नरम खडक व मुरूमयुक्त जमीन असल्यास पाणी लागण्यास फायदा होतो.
जमिनीतील खडकावरच सर्वकाही अवलंबून :-
जमिनीच्या खडकांवर तसेच त्या खडकांच्या रचनेवर विहिरींना होणार पाणीपुरवठा अवलंबून असतो. ज्या ठिकाणी भेगा, सच्छिद्रता तसेच पुष्कळ संधी असेल अशा खडकात जास्त प्रमाणात पाणीपुरवठा असतो. रूपांतरित खडक तसेच सच्छिद्र खडकात भेगा कमी असतात त्यामुळे तिथे पाणीपुरवठा असणे कठीण असते. चिकन मातीत विहिरींना कमी प्रमाणात पाणी भेटते.
Share your comments