खरीप हंगामातील पिकांचे नुकसान सतत च्या पाऊसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झाले आहे. राज्य सरकारने याबद्धल आदेश ही केले होते की अतिवृष्टी चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल. दिवाळी नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली होती मात्र उरलेली २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना कधी भेटनात हा प्रश्न उपस्थित झालेला होता मात्र शेतकऱ्यांच्या चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर का होईना पण शेतकऱ्यांच्या खात्यात उरलेली २५ टक्के रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यासाठी ७१ निधी मंजूर झाला असून पहिला मान उस्मानाबाद जिल्ह्याने मिळवला आहे. मागील वेळी २३७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते तर आता ७१ कोटी रुपये ची मंजुरी देण्यात आली आहे. सर्व बँकांना या पैशाचे वितरण तहसीलदार स्तरावरून देण्यात येणार आहेत.
अशाप्रकारे मदतीची घोषणा :-
अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील न भरून निघणारे पिकांचे नुकसान झाले आहे. जे की बागायती क्षेत्रासाठी १३ हजार तसेच जिरायती क्षेत्रासाठी १० हजार आणि फळबागा व बहुवार्षिक पीक असलेल्या शेतीसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी घोषणा करण्यात तर आली होती. पहिल्या टप्प्यात ७५ निधींचे वितरण झाले होते तर आता जो उर्वरित निधी आहे तो बँकेच्या खात्यांवर जमा होणार आहे. सोमवार पासून खात्यामध्ये पैसे जमा होतील असा अंदाज वर्तविला आहे.
यावेळी होणार नाही विलंब :-
पहिल्या टप्यात सरकारने घोषणा केली होती जे की आठ दिवसाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षपणे पैसे जमा होण्यास चालू झाले होते. जे की पहिल्या टप्यात शेतकऱ्यांची खाते क्रमांक तपासणी तसेच आधारकार्ड क्रमांक तपासणी या सर्व बाबी तपासाव्या लागत होत्या. पण या दुसऱ्या टप्यात शेतकऱ्यांची सर्व माहिती तयार च आहे. बँक अधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले की बँकेच्या खात्यामध्ये तहसीलदार स्तरावरून पैसे जमा होतील आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
शेतकऱ्यांचा खातेनिहाय यादी बॅंकांना :-
जिल्हा प्रशासनाकडून अनुदानाची जी रक्कम आहे तसेच जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची यादी बँकेला देण्यात सुद्धा आलेली आहे. मराठवाडा विभागात सर्वात आधी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. जे की येईल या सोमवार पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. जरी ही रक्कम कमी वाटत असली तरी शेतकऱ्यांच्या गरजेवेळी ही रक्कम देण्यात आलेली आहे.
Share your comments