PM Fasal Bima Yojana: पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) एक योजना आहे ज्या अंतर्गत कोणत्याही आपत्तीमुळे पिकांचे नुकसान कव्हर केले जाते. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 फेब्रुवारी 2016 रोजी सुरू केली होती. पीक निकामी झाल्यास या योजनेअंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यास मदत होत असते.
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, योजनेंतर्गत आतापर्यंत 36 कोटींहून अधिक शेतकरी अर्जदारांचा विमा उतरवण्यात आला आहे आणि यावर्षी 4 फेब्रुवारीपर्यंत 1,07,059 कोटी रुपयांहून अधिक दाव्यांची भरपाई करण्यात आली आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या सुमारे 85 टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्प शेतकरी आहेत.2020 मध्ये या योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या. आता कोणत्याही नैसर्गिक कारणाने पिकांची नासाडी झाली तर सर्वप्रथम विमा कंपनीला 72 तासांच्या आत कळवावे लागेल. त्यानंतर विमा कंपनी शेतांची पाहणी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती पाठवेल. ती व्यक्ती शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे मुल्यांकन करेल आणि त्याचा अहवाल विमा कंपनीला सादर करेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळतो.
हेही वाचा : राज्यात दोन वर्षात उभारण्यात येणार 14 हजार कांदा चाळी
अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेची अधिकृत वेबसाइट pmfby.gov.in नोंदणी करावी लागेल. यासाठी नोंदणी करताना मागितलेली सर्व माहिती भरावी लागेल, ऑफलाइन अर्ज करताना तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेतून या विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
अर्ज करण्याची पद्धत
-
PMFBY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
-
होमपेजवर Farmers Corner वर क्लिक करा
-
आता तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि तुमचे खाते नसेल तर अतिथी शेतकरी म्हणून लॉगिन करा
-
नाव, पत्ता, वय, राज्य इत्यादी सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
-
शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
पीएम फसल विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
- शिधापत्रिका - रेशन कार्ड
- आधारशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक.
- ओळखपत्र
- शेतकऱ्याचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो
- सात बारा उतारा
- शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
- शेत भाड्याने घेतली असल्यास शेतमालकाशी केलेल्या कराराची छायाप्रत.
Share your comments