1. इतर बातम्या

शेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई

विजेवरील होणारा अतिरिक्त खर्च कमी व्हावा आणि सोलर पॅनलद्वारे शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करु शकेल . यासाठी सरकारने फ्री सोलर पॅनल योजना सुरु केली आहे. (free solar panel scheme ) यात शेतकरी आपली शेतजमीन किंवा घराचे छत खासगी कंपनीला भाडाने द्यावे लागेल.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


विजेवरील होणारा अतिरिक्त खर्च कमी व्हावा आणि सोलर पॅनलद्वारे शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करु शकेल . यासाठी सरकारने फ्री सोलर पॅनल योजना सुरु केली आहे. (free solar panel scheme )  यात शेतकरी आपली शेतजमीन किंवा घराचे छत खासगी कंपनीला भाडाने द्यावे लागेल. याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळेल, ज्यातून  ते आपले उत्पन्न दुप्पट करु शकतील.  याशिवाय  या योजनेतून सोलर पॅनल पुर्णपणे फ्री लावसे जातील.  यातील निर्मित होणारी अतिरिक्त विज पण शेतकरी विकू शकतात.  आज या लेखात या योजनेविषयी आपण माहिती घेणार आहोत.

काय आहे सोलर पॅनल योजना

या योजनेतून शेतकरी आपली शेतीचा एक तृतीयांश  भागाला सोलर पॅनललसाठी  भाड्याने देऊ शकतात.  यानंतर  खासगी कंपनी त्यांना एक लाख रुपये प्रति एकर प्रमाणे भाडे देतील.  या योजनेत शेतकरी २५ वर्षाकरिता आपले शेत कंपनीला  भाड्याने देऊ शकतात. यादरम्यान  कंपनी नियमितपणे प्रत्येक वर्षी पैसे देईल.  निर्धारित २५ वर्षाचा काळ संपल्यानंतर कंपन्या शेतकऱ्यांना ४ लाख रुपये प्रति एकर प्रमाणे देईल.  यातून शेतकऱ्यांची कमाई ही चौपट होईल.

निर्मित झालेली विज विकता येणार 

सोलर पॅनल योजना अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. आपल्या पडित जमिनीवर सोलर पॅनल लावल्यानंतर सौर ऊर्जापासून विज तयार करु शकतात. यातून तयार झालेली  विज ही  सरकारी आणि खासगी विज कंपन्यांना विकून शेतकरी त्यातूनही पैसा कमावू शकतील. एका मेगावॅटच्या सोलर प्लांटसाठी सहा एकर जमिनीची गरज लागते. यातून १३ लाख युनिट विज तयार केली जाते. ही विज विकून आपण चांगला पैसा कमावून शकतो. दरम्यान प्रधानमंत्री सोलर पॅनल योजना कुसूम स्कीम च्या अंतर्गत नोंदणी करुन याचा लाभ घेऊ शकतो.

मोफत सोलर पॅनल  योजनेचा फायदा

सोलर पॅनल योजनेच्या अंतर्गत खासगी कंपन्यां शेतकऱ्यांना भाडे म्हणून एक लाख रुपये प्रति एकरासाठी देते.  दरम्यान  २५ वर्षासाठी एका एकराचे भाडे ४ लाख रुपये होतील.  सोलर पॅनल बसविण्यासाठी शेतकऱ्याला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. पीपीपी मॉडलवर खासगी कंपन्यां  स्वत खर्च करुन हे पॅनल बसवतील.

English Summary: Farmers will earn double income by renting the roof of their house, know the benefits of solar panels Published on: 26 September 2020, 05:03 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters