कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने सगळीकडे मोर्चे आणि आंदोलने सुरू आहेत. आंदोलन सुरू दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीतपणे केला जाईल तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून दिले जाईल अशा घोषणा आंदोलकांच्या समाधानासाठी केल्या जात असतात. परंतु वैजापूर कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांना फक्त आश्वासन च दिले नाही तर महावितरण विभागाने शेतकऱ्यांची नुकसानभरपाई करून दिली जाणार आहे. तुम्हाला हे खोटे वाटेल पण स्वतः कार्यकारी अभियंता ने आंदोलकांना पत्र दिले आहे जे की यामध्ये ४८ तासात जर रोहित्र दिले नाही तर प्रति तास ५० रुपये रक्कम दिली जाईल.
काय आहे महावितरणच्या पत्रात?
जर रोहित्रामध्ये काय बिघाड झाला तर तो ४८ तासात नीट केला जाईल असे कार्यकारी अभियंता ने सांगितले आहे. २४ तासात कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जाईल. फक्त एवढेच नाही, जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर प्रति तास ग्राहकांना ५० रुपये दिले जातील तसेच ४८ तासात जर रोहित्र दुरुस्त नाही झाले तर ५० रुपये ग्राहकांना दिले जाणार आहेत. कार्यकारी अभियंता ने स्वतः पत्रात उल्लेख केला आहे की वीज ग्राहक च्या बाबतीत २५-५० रुपये अशी नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
पत्राप्रमाणे कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन :-
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या घेऊन महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. महावितरनाचा जो कारभार चालू होता त्याचा आमदारांनी चांगलाच पाढा वाचलेला आहे. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई महावितरण देणार असल्याचे कार्यकारी अभियंता दौड यांनी सांगितले आहे. पत्रामध्ये नमूद केले आहे की जर नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा तसेच दुरुस्तीचे काम झाली नाहीत तर शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज करावे असे अभियंता दौड यांनी सांगितले आहे. जे आश्वासन अभियंता यांनी दिले आहे तर जर आश्वासनाप्रमाणे मुदत जर मिळाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा ईशारा जाधव यांनी दिलेला आहे.
कृषी पंपधारकांच्या काय आहेत समस्या :-
रब्बी हंगाम सुरू होताच कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित होतो हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे जे की कन्नड तालुक्यामध्ये रोहित्रामध्ये बिघाड, अनियमित विद्युत पुरवठा तसेच विद्युत पुरवठा खंडित होणे आणि रोहित्रामध्ये बिघाड अशा समस्या सारख्या उदभवत असतात त्यामुळे रब्बीतील पिकांचे नुकसान होते. आधीच निसर्गाचा लहरीपणा असल्याने पिकांचे नुकसान होत आहे आणि त्यामध्ये अशा समस्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि त्यात दुरुस्ती ची कामे सुद्धा वेळेवर होत नसल्याने महावितरणच्या उंबऱ्याला शेतकऱ्यांना धडका घ्याव्या लागत आहेत.
Share your comments