म्हातारपणात आपल्याला दुसऱ्यावर विसंबून राहावे लागते. यामुळे अनेकांच्या हातात पैसा राहत नाही. याच धर्तीवर सरकारने बळीराजासाठी एक योजना आणली आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतर्गंत बळीराजा आपल्या वृद्धपकाळात सुखाने जगू शकतो. अल्प भूधारक अत्यल्प भूधारकांसाठी ही योजना खूप फायद्याची आहे. सरकारने ही योजना २०१९ मध्ये आणली होती.
या योजनेतून बळीराजाला आपल्या वृद्धपकाळात आर्थिक साहाय्यता मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावे लागेल. गुंतवणूक म्हटलं की आपल्याला चिंता लागली असेल. पण शेतकऱी मित्रांनो या योजनेसाठी नाममात्र पैशांची गुंतवणूक करावी लागेल. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत आपल्याला गुंतवणूक करायची आहे. गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्यांना दर महा ३ हजार रुपयांची पेन्शन मिळेल. या योजनेत आतापर्यंत १९ लाख ९९ हजार ३१९ लोक जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही जेवढ्या पैशांची गुंतवणूक कराल सरकारही तितकेच पैसे देत असते. या योजनेत तुम्ही रुपये ५५ ते २०० रुपयापर्यंतची गुंतवणूक करु शकता. ही रक्कम तुम्ही थेट मानधन योजनेत जमा करु शकता. जर एखाद्या शेतकऱ्यांने या योजनेत गुंतवलेले पैसे १० वर्षाच्या आत काढू घेतले तर त्याला बँकेच्या व्याजदराप्रमाणे पैसे परत मिळतात. १८ ते ४० वर्षापर्यंत आपल्याला यात पैसे टाकयचे आहेत. त्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी शेतकऱ्याला दर महा ३ हजार रुपयांची पेन्शन चालू होईल. योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती निधन पावला तर या योजनेचा पैसा त्याच्या पश्चात पत्नीला मिळतो. परंतु लक्षात ठेवा पत्नीला ही पेन्शन निम्म मिळत असते. पत्नी व्यतिरिक्त ही पेन्शन कोणालाच मिळत नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी : लाभार्थी हा १८ ते ४० वयातील असावा. लाभार्थ्याकडे साधारण २ हेक्टर जमीन असावी. शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे. बँकेचे खाते आवश्यक असून बँकेचे पासबुक हवे. इच्छुक शेतकरी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. सामायिक सुविधा केंद्राच्या पोर्टलवर जाणून तुम्ही ऑनलाईन नोंदणी करु शकता. विशेष म्हणजे यासाठी पैसे लागत नाही. जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेसाठी (पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना) नोंदणी केली असेल तर तुम्हाला दुसरे कोणते कागद दाखविण्याची गरज नाही.
Share your comments