किसान रेलची ची महत्वाची भूमिका वेळेत शेतीमाल बाजारपेठेत दाखल करण्याची असते आणि याच किसान रेलमुळे पालघर चे चिकू दिल्लीच्या बाजारामध्ये दाखल झाले आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतीमाल परराज्यातील बाजारपेठेत दाखल झाला होता. चार पार्सल व्हॅनची सोय झाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला होता पण आता जानेवारी पासून एकाच पार्सल व्हॅनमधून शेतीमाल वाहतूक करण्यात येत आहेत. वाहतूक करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे लासलगाव बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप यांनी पार्सल व्हॅन ची संख्या वाढावी यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री यांना लेखी आवेदन देत मागणी केली आहे.
किसान रेलच्या वाढीव क्षमतेमुळे झाला होता फायदा :-
लासलगाव बाजार समितीच्या परिसरातील गावांमध्ये कांदा, द्राक्षे, भाजीपाला, फळे आणि भुसार शेती मालाची शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. परराज्यात माल विकावा व यामधून शेतकऱ्याना चांगला मोबदला मिळावा म्हणून नाशिक रोड रेल्वे स्थानकातून किसान रेल सुरू करण्यात आली. लासलगाव रेल्वे स्थानकात ही रेल्वे थांबते. सुरुवातीस एकच पार्सल व्हॅन ची सुविधा करण्यात आल्यामुळे फक्त २४ टन च माल पाठवता येत होता मात्र मागणीत वाढ झाल्याने चार पार्सल व्हॅन सुरू केल्या. एप्रिल २०२१ ते डिसेंम्बर २०२१ दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतीमाल निर्यात झाल्यामुळे या मालाच्या भाड्यातून रेल्वे पार्सल विभागाला ४ कोटी ५४ लाख १ हजार ८०५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
उत्पादन वाढूनही उत्पन्न वाढेना, काय आहेत अडचणी?
लासलगाव परिसरात फक्त कांदा नाही तर त्यासोबत द्राक्षे, भाजीपाला, फळे व इतर हंगामी पिकांची सुद्धा लागवड करण्यात येते तसेच किसान रेल ची सुद्धा सुविधा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पिकांवर सुद्धा भर दिली आहे. जानेवारी महिना सुरू झाल्यापासून किसान रेलमधील शेतीमाल वाहतुकीची क्षमता कमी करण्यात आल्यामुळे माल जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक पातळीवर दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्पादित झालेल्या मालाला योग्य दर मिळावा: सभापती
शेतीमधून उत्पन्न वाढावे म्हणून शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात जे की लासलगाव परिसरातील शेतकरी फक्त कांदा च नाही तर इतर पिकांवर सुद्धा भर देत आहेत. जानेवारी पासून पार्सल व्हॅन ची संख्या १ वरच आणल्यामुळे परराज्यात शेतमाल पाठवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यासाठी सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी लेखी आवेदन दिले आहे.
Share your comments