1. इतर बातम्या

शेतकरी मित्रांनो आधार कार्ड आहे ना? मग तुम्हालाही मिळेल 'एवढे' कर्ज, जाणुन घ्या याविषयी

देशात आधार कार्डचा (Aadhar card) उपयोग जवळपास सर्व महत्त्वाच्या कामात केला जातो. आधार कार्ड हे गैरसरकारी व सरकारी (Government and non-government) अशा दोन्ही कामात उपयोगी पडणारे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड विना भारतात साधा एक सीम देखील खरेदी केलं जाऊ शकत नाही. आधार कार्ड बँकेत खाते खोलण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, शाळा महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, रेशन घेण्यासाठी, मतदान कार्ड बनवण्यासाठी, पॅन कार्ड बनवण्यासाठी, अशा विविध कामात उपयोगात आणले जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
loan through aadhar card

loan through aadhar card

देशात आधार कार्डचा (Aadhar card) उपयोग जवळपास सर्व महत्त्वाच्या कामात केला जातो. आधार कार्ड हे गैरसरकारी व  सरकारी (Government and non-government) अशा दोन्ही कामात उपयोगी पडणारे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड विना भारतात साधा एक सीम देखील खरेदी केलं जाऊ शकत नाही. आधार कार्ड बँकेत खाते खोलण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, शाळा महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, रेशन घेण्यासाठी, मतदान कार्ड बनवण्यासाठी, पॅन कार्ड बनवण्यासाठी, अशा विविध कामात उपयोगात आणले जाते.

मित्रांनो एवढेच नाही तर या एवढ्या महत्त्वाच्या कागदपत्राद्वारे कर्ज देखील मिळवली जाऊ शकते. हो मित्रांनो फक्त आधार कार्डचा उपयोग करून आपण सहजरीत्या लोन प्राप्त करू शकता. मित्रांनो जर आपणास लोनची आवश्यकता असेल तर आत्ता फक्त आधार कार्डद्वारे देखील लोन प्राप्त केले (Get loan through Aadhar card) जाऊ शकते. जर आपण लोन घेण्यासाठी पात्र असाल तर आपणास जास्त डॉक्यूमेंटची गरज भासणार नाहीय. आपण फक्त आधार कार्ड दाखवून देखील लोन प्राप्त करू शकता. जर आपणास आधार कार्डद्वारे लोन प्राप्त करायचे असेल तर आपण ते ऑनलाईन घरबसल्या देखील प्राप्त करू शकता. यासाठी आपणास ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म भरावा लागेल आणि ई-केवायसी करण्यासाठी डॉक्यूमेंटची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी आपल्याला विशेष म्हणजे कोणत्याच कागदपत्रांची हार्ड कॉपी बँकेत सादर करावी लागणार नाहीय.

कसे मिळणार आधार कार्डद्वारे लोन (How to get a loan through Aadhar card)

मित्रांनो जर आपणास लोन घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपल ज्या बँकेत अकाऊंट आहे त्या बँकेचे मोबाईल ॲप्लिकेशन अथवा वेबसाइट ओपन करावी लागेल. बँकेच्या ॲप्लिकेशन अथवा वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे आपणास लोनचा पर्याय दिसेल, या लोनच्या ऑप्शनवर जाऊन आपणास पर्सनल लोन सिलेक्ट करावे लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण लोन घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे चेक करावे लागणार आहे एवढे केल्यानंतर अप्लाय नाऊ (Apply Now) या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. अप्लाय नाऊ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपणास एक ॲप्लिकेशन फॉर्म देखील भरावा लागणार आहे या एप्लीकेशन फॉर्म मध्ये आपणास आपली वैयक्तिक माहिती तसेच आपल्या रोजगाराची माहिती या सर्व गोष्टींची माहिती द्यावी लागणार आहे. एवढे केल्यानंतर आपणास बँकेकडून एक कॉल केला जाईल व आपली माहिती सत्यापित केली जाईल. आपली माहिती व्हेरिफाय केल्यानंतर बँकेकडून आपणास कर्ज स्वीकृत केले जाईल अथवा फेटाळून लावले जाईल. जर आपणास कर्ज मंजूर झाले तर ते आपल्या सेविंग अकाउंट मध्ये बँकेद्वारे जमा केले जाते.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की जर आपणास लोन प्राप्त करायचे असेल तर आपले वय 23 वर्षे असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त आपण भारताचे नागरिक असणे गरजेचे असते सोबतच आपल्या जवळ नॅशनल अथवा मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी असणे देखील अनिवार्य असते. अथवा आपला स्वयंरोजगार असेल तर त्या संदर्भात आपल्याकडे पुरावा असणे गरजेचे असते. याव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची बाब असते ती क्रेडिट स्कोरची जर आपला क्रेडिट स्कोर चांगला असेल तर आपणास लगेचच लोन दिले जाते.

English Summary: farmers can get loan through aadhar card learn more about it Published on: 11 January 2022, 10:55 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters