1. इतर बातम्या

शेतकऱ्यांसाठीच्या सत्कार्यात खोडा आणू नका ! प्रशांत डिक्कर

जळगाव : पीक विम्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही शेतकऱ्यांसाठी लढाई करत संग्रामपूर जळगाव व शेगाव या ३ तालुक्यासाठी पिक विम्याचा मंजुरीचा प्रश्न मार्गी लावला. पंरतु राजकीय विरोधकांच्या कट कारस्थानाने मंजूर असलेल्या पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी विलंब होत

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शेतकऱ्यांसाठीच्या सत्कार्यात खोडा आणू नका ! प

शेतकऱ्यांसाठीच्या सत्कार्यात खोडा आणू नका ! प

पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी विलंब होत असल्याने याचा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मिळत असलेला पिक विमा यामधे जाणीवपूर्वक खोडा निर्माण करुन केवळ श्रेय घेण्यासाठी आटा पिटा करत आहेत.

. करु द्या त्या झारीतील शुक्राचार्यांचा शेतकरी समाचार घेतिलच शेतकऱ्यांच्या शक्तिवर पिक विमाची समस्या दूर करून आम्ही शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडी दूर करत आहोत. पण हि बाब येथिल भाजपा नेतृत्वाला खटकत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. आमचे दैवत असलेल्या पोशिंद्या शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत असतांना काही भाजप वाल्यांच्या पोटात दुखत आहे‌.

शेतकऱ्यांना पिक विमा मिळतच नाही अशा बातम्या प्रकाशित करुन शेतकऱ्यांनमधे संभ्रम निर्माण केल्या जात होता. गेल्या एक वर्षामधे पिक विमा मागण्यांसाठी कुठही दिसले नाहित पण पिक विमा मंजूर होताच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम येणार आहे.हे पाहुन. याच मागणीसाठी अचानक सरसावले आहेत. अरे भावांनो, तुमचे सरकार केंद्रात आहे खरंच तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी वाटत असेल तर दिल्लीत जाऊन तुमचे म्हणने मांडा पण ते होतांना दिसत नाही‌. निवड मुंबईत बैठकांचा धुराळा उडवण्याचे नाटक केल्या जात आहे. हे सार नाटक आता लपून राहिल नाही शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे.

म्हणून आमची हात जोडून विनंती आहे. शेतकऱ्यांना मिळत असलेल्या पिक विम्यात खोडा आणु नका. असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सावरगाव येथे पार पडलेल्या शेतकरी बैठकीत बोलतांना केले. या वेळी स्वाभिमानीचे पदाधिकारी, शेतकरी व बहूसंख्य तरुणांची उपस्थिती होती.

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: Farmer price ceremony. Published on: 06 September 2021, 09:09 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters