आधार कार्ड सगळ्यात महत्वाच्या कागदपत्रांत पैकी एक कागदपत्र आहे. कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ असो की अन्य कुठल्याही कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. क्या आधार कार्ड वर थोडी जरी चूक राहिली तरी नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
त्यामुळे आधार कार्ड वरची चुका दुरुस्ती असो की अन्य काही आधार कार्ड संबंधी कामासाठी आधार सेवा केंद्रावर जावे लागते. परंतु आता ही कटकट मिटणार असून आता आधार कार्ड धारक फेस अथेंटिकेशन च्या माध्यमातून स्वतःची ओळख कन्फर्म करू शकता.
यासाठी FaceRd नावाचे युआयडीएआय अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया ने लॉन्च केले आहेत.
काय होईल या ॲपची मदत?
हे ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करता येऊ शकते. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, फेस अथेंटिकेशन टेक्नॉलॉजी च्या मदतीने हे ॲप आधार अथेंतिकेशन साठी एखाद्या व्यक्तीचा चेहरा थेट कॅप्चर करते. या फेस ऑथेन्टीकेशनचा वापर अनेक आधार प्रमाणीकरण ॲप द्वारे केला जाऊ शकतो.
ज्यामध्ये जीवन प्रमाण, रेशन वितरण, कोविन लसीकरण ॲप, शिष्यवृत्ती योजना तसेच शेतकरी कल्याण योजनांचा समावेश आहे. या बाबतीत केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, युआयडीएआय आरडी ॲप द्वारे आधार फेस ऑथिंटीकेशन फीचर चा वापर केला जाऊ शकतो.
नक्की वाचा:Goverment Scheme:शेतकऱ्यांचा शेतमाल भरेल आता उडान,केंद्राची ही योजना ठरेल लाभदायी
तसे अनेक आधार प्रमाणीकरण ॲप्स साठी वापरली जाऊ शकते. आधार फेस ऑथेन्टीकेशन तंत्रज्ञान यूआयडीएआय मी स्वतः विकसित केले आहे.
जर आपण काही अहवालांचा विचार केला तर या नुसार या ॲप मुळे आधार धारकांना यापुढे लोकेटर आधार नोंदणी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर देखील यावर करता येणार आहे.
त्याआधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्लेस्टोर वर जाऊन FaceRd डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर या ॲप वर सांगितलेले सूचनांचे अनुसरण करावे लागेल आणि पुढे जा वर क्लिक करा. चेहरा प्रमाणीकरणासाठी तुमचा चेहरा प्रकाशात असावा आणि तुमचा बॅकग्राऊंड स्पष्ट असावा.
नक्की वाचा:घाई करा मुदत संपत आहे!वर्षाला भरा 299 रुपयेचा हप्ता आणि मिळवा दहा लाखांचा विमा,वाचा या योजनेविषयी तपशील
Share your comments