MFOI 2024 Road Show
  1. इतर बातम्या

Papad Making: दोन लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू करा हा व्यवसाय, कमाऊ शकता एक लाख रुपये

कमीत कमी गुंतवणुकीतून करता येण्यासारखे भरपूर असे व्यवसाय आहेत.व्यवसाय कुठलाही असला परंतु त्याचे योग्य मार्केटिंग, आपण तयार केलेल्या मालाचा दर्जा दृष्टिकोन ठेवला तरच यश नक्कीच मिळते.कमी गुंतवणुकीतूनकरता येणारा आणि चांगल्या प्रकारे नफा देणाराव्यवसाय म्हणजे पापड मेकिंग बिझनेस हा होय.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
papad makindg bussiness

papad makindg bussiness

कमीत कमी गुंतवणुकीतून करता येण्यासारखे भरपूर असे व्यवसाय आहेत.व्यवसाय कुठलाही असला परंतु त्याचे योग्य मार्केटिंग, आपण तयार केलेल्या मालाचा दर्जा दृष्टिकोन ठेवला तरच यश नक्कीच मिळते.कमी गुंतवणुकीतूनकरता येणारा आणि चांगल्या प्रकारे नफा देणाराव्यवसाय म्हणजे पापड मेकिंग बिझनेसहाहोय.

 हा उद्योग सुरू करण्यासाठी तुम्ही मुद्रा योजनेचा आधार घेऊ शकता. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला परवडणाऱ्या व्याजदराने  तुम्ही तीन ते चार लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता.यासाठी राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने प्रकल्प अहवाल तयार केला आहे.या लेखात आपण पापड मेकिंग बिजनेस विषयी माहितीघेऊ.

पापड मेकिंग बिजनेस विषयी….

या प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार एकूण सहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सुमारे 30 हजार किलो उत्पादन क्षमता  तयार होईल. हा व्यवसाय जर तुम्हाला खर्च करायचा असेल तर त्यासाठी सहा लाख रुपये खर्च करावे लागतात. या एकूण सहा लाखांमध्ये स्थिर भांडवल आणि कार्यरत भांडवल खर्च समाविष्ट आहे.कॅपिटल मध्ये दोन मशीन, पॅकेजिंग मशिन उपकरणं सारखे सर्व खर्च समाविष्ट आहेत.तसेच तो वर्किंग कॅपिटल मध्ये कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन, तीन महिन्यासाठी लागणारा कच्चामाल आणि उपयुक्तता उत्पादनाचा खर्च समाविष्ट आहे.याशिवाय जागेचे भाडे, विज,पाणी तसेच टेलिफोन बिल यासारखे खर्चाचाही या खर्चामध्ये समावेश होतो.

 या उद्योगासाठी लागणारी यंत्रे

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन मिक्सर, प्लॅटफॉर्म बॅलेन्स, एलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओव्हन,संगमरवरी टेबल टॉप,चकला रोल, एल्युमिनियम ची भांडी आणि रॅक या सारख्या यंत्राची आवश्यकता असते. हा उद्योग स्थापन करण्यासाठी कमीत कमी दोनशे पन्नास चौरस फूट जागा लागते. जर तुमच्याकडे जागा नसेल तर  तुम्ही भाड्याने घेऊ शकतात.ज्यासाठी तुम्हाला प्रति महिना  किमान पाच हजार रुपये भरावे लागतात.मनुष्य बळा मध्ये तीन अकुशल कामगार, बोल कुशल कामगार आणि एक सुपरवायझर यांच्या आवश्यकता असते.त्यांच्या वेतनावर भाषिक पंचवीस हजार रुपये खर्च येईलजो तुम्ही कॅपिटल भांडवला मध्ये जोडू शकता.

तुम्हाला दोन लाख रुपये गुंतवावे लागतात……

एकूण सहा लाख रुपयांचे भांडवल पैकी तुम्हाला दोन लाख रुपये गुंतवावे लागतात. आपले चार लाख रुपयांचे भांडवल हे तुम्हाला मुद्रा योजने अंतर्गत मिळेल.यासाठी तुम्ही या योजनांतर्गत बँकेत अर्ज करू शकता.यासाठी तुम्हाला बँकेत कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क किंवाहमीशुल्क भरावे लागणार नाही.वेदर केली कर्जत पाच वर्षात परत करू शकता.

या व्यवसायातील कमाईचे समीकरण..

उत्पादन झाल्यानंतर ते फार मोठ्या प्रमाणात विकावी लागते.यासाठी तुम्ही लहान किराणा दुकाने तसेच मॉल सुपर मार्केटआणि किरकोळ विक्रेत्यांचे संपर्क साधून आपल्या मालाची विक्री करू शकता. एका अंदाजानुसार कापड विक्री व्यवसायाच्या माध्यमातून होणारा नफा गुंतवणुकीच्या रकमेच्या एक पंचमांश आहे अपने पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्ही दरमहा एक लाख रुपये कमवू शकता.यामध्ये खर्च वजा जाता तुम्ही35 ते 40 हजार रुपयांपर्यंत नफा कमवू शकता.

( संदर्भ- मराठी बिझनेस आयडिया )

English Summary: establish papad making bussiness to help mudra yojana Published on: 16 December 2021, 06:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters