1. इतर बातम्या

EPFO: पीएफचे पैसे जमा झाले नाहीत? टेन्शन घेऊ नका, अशी करा सोप्या मार्गाने तक्रार...

EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही संघटना नोकरदारवर्गसाठी अनेक सुविधा पुरवत असते. EPFO ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे. ईपीएफओ सध्या 24.77 कोटी खाती सांभाळत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही मोजकी रक्कम सुरक्षित ठेवली वाजते.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
EPFO

EPFO

EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही संघटना (Employees Provident Fund Association) नोकरदारवर्गसाठी अनेक सुविधा पुरवत असते. EPFO ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे. ईपीएफओ सध्या 24.77 कोटी खाती सांभाळत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही मोजकी रक्कम सुरक्षित ठेवली वाजते.

ईपीएफओच्या नियमांनुसार, कंपनी आणि कर्मचार्‍यांच्या (employees) वतीने 12-12 टक्के मूळ वेतन आणि डीए दर महिन्याला पीएफ खात्यात जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये पगार मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत पैसे जमा करण्याचा नियम आहे.

तुम्हाला सांगतो की, जेव्हा कंपनी कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे (PF money of employees) जमा करते तेव्हा ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना संदेश पाठवला जातो. याशिवाय कर्मचारी EPFO ​​वेबसाइटवर (EPFO website) लॉग इन करून देखील तपासू शकतात.

Gold Price: सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! 10 ग्रॅम सोने खरेदी करा फक्त 30,000 रुपयांना...

घाबरण्याची गरज नाही

जर तुमच्या कंपनीने पीएफचे पैसे कापले असतील आणि तुम्हाला EPFO ​​कडून जास्त अपडेट मिळत नसेल तर घाबरण्याची गरज नाही. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे पीएफ पैसे पीएफ खात्यात जमा करू शकता.

पैसे जमा केले नाहीत तर तक्रार कशी करावी हे जाणून घ्या?

तक्रार (complaint) करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्ही Register Grievance वर जा, त्यावर क्लिक करा. त्यानंतर पीएफ सदस्य, ईपीएस पेन्शनर, नियोक्ता यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.

यामध्ये पीएफ सदस्य निवडा आणि UAN क्रमांक आणि सुरक्षा कोड टाका. आता Get Details या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Get OTP वर जा. यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. आता तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

पीएम किसान योजनेत केंद्राकडून मोठा बदल! या पाच कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे...

कायदेशीर कारवाई

कर्मचाऱ्याने तक्रार केल्यानंतर EPFO ​​कंपनीकडे चौकशी करेल. जर असे स्पष्ट झाले की कंपनीने कर्मचार्‍यांचे पैसे कापले आहेत, परंतु ते ईपीएफओमध्ये जमा केले नाहीत, तर अशा परिस्थितीत कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) म्हणजे काय?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही भारतातील राज्य-प्रोत्साहित अनिवार्य अंशदायी पेन्शन आणि विमा योजना प्रदान करणारी संस्था आहे. सभासद आणि आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. त्याच्या व्याजदराचा निर्णय CBT द्वारे घेतला जातो.

महत्वाच्या बातम्या:
कापसाला मिळणार उच्चांकी भाव! कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 28 सप्टेंबरला मिळणार आनंदाची बातमी, पहा किती वाढणार पगार?

English Summary: EPFO: PF money not deposited? Don't get tensed Published on: 07 September 2022, 01:51 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters