1. इतर बातम्या

EPFO: नोकरदारांना नवरात्रीमध्ये मिळणार मोठी बातमी! PF खात्यात जमा होणार इतके पैसे

EPFO: नोकरदार वर्गाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते. नवरात्रीच्या काळात सरकार PF खातेदारकाच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा करू शकते. त्यामुळे नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीएफ खातेधारकांना त्यांच्या ठेवींवर ८.१ टक्के दराने व्याज मिळेल.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
EPFO

EPFO

EPFO: नोकरदार वर्गाला (Employed) लवकरच चांगली बातमी मिळू शकते. नवरात्रीच्या (Navratri) काळात सरकार PF खातेदारकाच्या (PF account holder) खात्यात व्याजाचे पैसे जमा करू शकते. त्यामुळे नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीएफ खातेधारकांना त्यांच्या ठेवींवर ८.१ टक्के दराने व्याज (Interest) मिळेल.

करोडो खातेदारांना फायदा

पीएफ खातेधारक खात्यात जमा झालेल्या पैशावर व्याज मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) पैसे कधी येणार याबाबत अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी सरकार सणानिमित्त भेट देऊ शकते, असे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवरात्रोत्सवादरम्यान सरकार देशातील करोडो पीएफ खात्यांमध्ये व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे.

खात्यात येईल इतकी रक्कम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये जमा केलेल्या रकमेवर सरकारने आधीच व्याजदर निश्चित केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी, EPF वर 8.1 व्याजदराने पैसे दिले जातील.

त्यानुसार, जर आपण संपूर्ण गणना पाहिली, तर कोणत्याही पीएफ खातेधारकाच्या खात्यात व्याजाची रक्कम येईल, ती त्याच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असेल. सरकार जमा केलेल्या रकमेवर ८.१ टक्के दराने व्याज हस्तांतरित करेल.

अशा प्रकारे, जर तुमच्या पीएफ खात्यात एक लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला 8.1 टक्के दराने वार्षिक 8,100 रुपये व्याज मिळतील. दुसरीकडे, जर तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम 10 लाख रुपये असेल, तर 81,000 रुपये व्याज म्हणून तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जातील.

भारतातील सर्वात स्वस्त सीएनजी कार! 3 लाखांपेक्षाही कमी किंमत; 31KM पेक्षा जास्त मायलेज

चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर

यापूर्वी पीएफ ठेवींवरील व्याजदर ८.५ टक्के होता. मात्र त्यात बदल करताना तो 8.1 टक्के करण्यात आला. विशेष म्हणजे हा दर गेल्या चार दशकांतील सर्वात कमी आहे. EPFO अनेक ठिकाणी पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.

या मार्गांनी आपण शिल्लक जाणून घेऊ शकता

SMS द्वारे

एसएमएसद्वारे शिल्लक तपासण्यासाठी, 'EPFOHO UAN ENG (तुम्हाला हिंदीमध्ये माहिती हवी असल्यास, ENG ऐवजी HIN लिहा)' टाइप करून 7738299899 वर संदेश पाठवा. तुम्हाला प्रत्युत्तरात शिल्लक माहिती मिळेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी केंद्राकडून मिळणार मोठी भेट; इतका वाढणार पगार

वेबसाइटद्वारे

EPFO ​​वेबसाइटला भेट द्या. 'आमच्या सेवा' च्या ड्रॉपडाउनमधून 'कर्मचाऱ्यांसाठी' निवडा. यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. आता UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. आता पीएफ खाते निवडा आणि ते उघडताच तुम्हाला शिल्लक दिसेल.

उमंग अॅपद्वारे

तुम्ही उमंग अॅपवरून पीएफ शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर उमंग अॅप ओपन करून ईपीएफओवर क्लिक करा. आता Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि तुमची PF शिल्लक प्रदर्शित होईल.

महत्वाच्या बातम्या:
राज्यातील शेतकरी मेटाकुटीला, कांद्याला भाव मिळेना आणि सडलेल्या कांद्याचे करायचे काय?
राज्यात पावसाची दमदार बॅटिंग! काही तासांत धो धो मुसळधार कोसळणार; IMD चा इशारा

English Summary: EPFO: Employees will get big news in Navratri! Amount to be deposited in PF account Published on: 21 September 2022, 11:51 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters