1. इतर बातम्या

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचा स्पष्टपणे इशारा! कुठल्याही परिस्थितीत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत नाही, भाजप सोबत सेनेने यावे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप भूकंप घडवून आणला असून ते आता सुरतला असून त्यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे.त्यामुळे शिवसेना फुटीच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार का?

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
eknath shinde keep some condition face to cm uddhav thakaray

eknath shinde keep some condition face to cm uddhav thakaray

 शिवसेना नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप भूकंप घडवून आणला असून ते आता सुरतला असून त्यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे.त्यामुळे शिवसेना फुटीच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार का?

 तसेच भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे का? या सगळ्या चर्चांना आता उधाण आले आहे. यादरम्यान  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काही अटी ठेवल्याचे समोर येत आहे.

त्यानुसार त्यांचे म्हणणे आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेचशिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये,

तसेच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. एकनाथ शिंदे हे चर्चेसाठी तयार आहेत परंतु सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे.

नक्की वाचा:मोठी बातमी! शिवसेनेत फूट, महाविकास आघाडी सरकार पडण्याचा धोका वाढला सरकार वाचवण्यासाठी हालचालींना वेग

 एकनाथ शिंदेचा बंडामागील काही कारणे

 एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते असून सर्व आमदारांचे प्रमुख असताना देखील त्यांना प्रमुख निर्णय यांच्या प्रक्रियेतून नेहमी दूर ठेवले जाते. हे नेमके कोणाच्या सांगण्यावरून केले जाते याचीही माहिती एकनाथ शिंदे यांना होती.

परंतु कालांतराने सर्व ठीक होईल या आशेने ते पक्षात काम करत राहिले. परंतु चालू झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीचे सर्व सूत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे दिली आणि इथूनच बंडाची ठिणगी पेटली.

उद्या विधानपरिषदेच्या निकालाच्या 12 तासांमध्ये सगळ्या राज्याचे राजकारण बदलले.तेव्हा महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं होत.

नक्की वाचा:मोठी बातमी! शिवसेनेत फूट, महाविकास आघाडी सरकार पडण्याचा धोका वाढला सरकार वाचवण्यासाठी हालचालींना वेग

एवढेच नव्हे तर त्या संबंधीची अधिकृत पत्रही राज्यपालांना देण्यात आले होते परंतु शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाईयांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता.

या सगळ्या पक्षांतर्गत मतभेदांमुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री बनण्याचा रस्ता रोखला गेला.विकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत पक्षाचे प्रमुख निर्णयांमध्ये देखील एकनाथ शिंदे यांना दूर ठेवले गेले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे भक्कम आणि बलाढ्य नेते असून देखील त्यांना मिळणारी वागणूक पाहून शिवसेनेचे इतर आमदारांनाही खटकत होती.

नक्की वाचा:मी पुन्हा येईन' चा प्रयोग होणार यशस्वी? एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यात दाखल..

English Summary: eknath shinde keep some condition face to cm uddhav thakaray Published on: 21 June 2022, 01:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters