गुवाहाटी मध्ये एकनाथ शिंदे सोबत गेलेले सर्व आमदारांची बैठकिला आता सुरुवात झाली आहे.दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारांसाठी ते रिलायंस रुग्णालयात दाखल झाले आहेत.
या सगळ्या परिस्थितीत बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले की, अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही किंवा शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही.
नक्की वाचा:मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारे शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा किंवा कुठल्याही पक्षात जाण्याचा अजून कुठलाही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही.
गुवाहाटीत जेवढे40 पेक्षा जास्त आमदार आहेत. या सर्वांनी शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही.
फक्त आम्ही बाळासाहेबांची असलेली हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जात आहोत आणि कुठल्याही प्रकारच्या सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड आम्ही करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नक्की वाचा:मी पुन्हा येईन' चा प्रयोग होणार यशस्वी? एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यात दाखल..
सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार भाजपची सत्ता असलेल्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. पुढे प्रतिक्रिया देताना म्हणाले की,आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून आम्ही त्यांच्या विचारधारेवर काम करणारे आहोत.
तसेच कुठल्याही आमदाराला जबरदस्तीने आणले नसून स्वखुशीने सगळे आमदार माझ्या सोबत एकत्र आले आहेत.
आम्ही कोणावरही कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार या पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
असेदेखील त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की मी काल एक कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे,उद्या देखील राहील.
Share your comments