MFOI 2024 Road Show
  1. इतर बातम्या

ED News : ईडीच्या नोटीसला रोहित पवारांनी दिले प्रतिउत्तर, शरद पवार म्हणतात...

Mla Rohit Pawar : आमदार रोहित पवार बारामती अॅग्रोचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोशी संबंधित कारखाने आणि कार्यालयांवर ईडीने छापे देखील टाकले होते. त्यानंतर पुन्हा रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Ed notice rohit pawar news

Ed notice rohit pawar news

Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ईडीने नोटीस बजावली आहे. नोटीसद्वारे रोहित पवारांना ईडीने २४ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मागील काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसंच ईडीची नोटीस आल्यानंतर रोहित पवारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याला प्रतिउत्तर दिलं आहे. यासोबतच आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.

रोहित पवार बारामती अॅग्रोचे संचालक

आमदार रोहित पवार बारामती अॅग्रोचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोशी संबंधित कारखाने आणि कार्यालयांवर ईडीने छापे देखील टाकले होते. त्यानंतर पुन्हा रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार काय म्हटले?

सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. संजय राऊत, अनिल देशमुख यांना देखील ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. राऊत, देशमुख अनेक दिवस तुरुंगात राहून आले आहेत. रोहित पवार यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. पण चिंता करण्याची गरज नाही, सरकारकडून आता विरोधकांना दाबण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

रोहित पवार यांनी काय दिले प्रतिउत्तर

ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन मॅसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केली की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. अशी मला अपेक्षा आहे, असं रोहित पवार ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

English Summary: ED News rohit pawar reply to ed notice sharad pawar news ajit pawar Published on: 20 January 2024, 11:51 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters