गावात राहून आपल्या व्यवसाय सुरू करायचा आहे. मग ही बातमी तुमच्या कामाची आहे. सोलर ऊर्जा (Solar Energy) च्या व्यवसाय करुन तुम्ही चांगला नफा कमावू शकता. याशिवाय हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या योजनासह तुम्ही जुडले जाऊ शकता. पंतप्रधान कृषी ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियान (कुसूम योजना) या योजनेचा विस्तार करण्याची घोषण यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. या योजनेंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप लावण्यासाठी मदत मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, शेतकऱ्यांना ग्रीडशी जोडण्य़ासाठी सोलर पंप लावण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. शेतकरी या सोलप पंपाने अतिरिक्त वीज ग्रीडला देऊ शकतील. यामुळे कमाईचा एक मार्ग मोकळा होईल. मोदी सरकारने मागील कार्यकाळातील फेब्रुवारी २०१९मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. यासाठी ३४ हजार ४२२ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेतल्याने घासलेट, आणि डिझेलवरील गरज कमी होईल, आणि शेतकरी सौर ऊर्जाशी जोडले जातील. या योजनेतून शेतकरी सोलर एनर्जी तयार करू शकतात. आणि त्याला ग्रीडली विकू शकतात. सौर उर्जासाठी जमीन असावी. त्या जमिनीवर काही काही पीक येत नसेल तरी तुम्ही त्यातून पैसा कमावू शकता. सरकारने आणलेल्या योजनेला पडीत जमीनही चालते. म्हणजे काय काही उत्पन्न न देणारी आपल्या शेतातील शेत जमीन आपल्याला कमाईचा मार्ग मोकळा करू देणार आहे.
पीएम कुसुम योजनेचे तीन प्रकार
१०,००० मेगावॅट ग्रीड-कनेक्टेड विकेंद्रीकृत नूतनीकरणक्षम उर्जा प्रकल्प,
१७.५०० लाख ग्रिड सौर उर्जा कृषी पंप आणि
१ दशलक्ष ग्रीड कनेक्ट सौर उर्जा कृषी पंप.
या योजनेंतर्गत 2022 पर्यंत या तिन्ही गोष्टी एकत्रित करून एकूण 25,750 मेगावॅट सौर क्षमता तयार करण्याची योजना आहे.
कुसूम योजनेची पात्रता
- अर्ज करणारा हा शेतकरी असावा.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक.
- अर्ज करण्यासाठी बँक खाते नंबर असणे आवश्यक.
- योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधारकार्ड
- बँक खाते पुस्तक(पासबुक)
- मोबाईल नंबर
- पुरव्यासाठी पत्ता
- पासपोर्ट आकारातील फोटो
ऑनलाईन अर्ज कसा कराल
- सर्वात आधी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- वेबसाईटवर गेल्यानंतर पेज ओपन होईल.
- होम पेजवर आपली नोंदणीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन आपला अर्ज करा. त्यात आपले नाव, पत्ता. आधार नंबर, मोबाईल नंबर आदींची माहिती भरावी.
- सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट या बटणांवर क्लिक करा.
- नोंदणी झाल्यानंतर आपल्याला सौर पंप सेटसाठी १० टक्के लागणारा खर्च जमा करण्याची सुचना मिळते. त्यानंतर काही दिवसातच आपल्या शेतात सोलर पंप बसवला जातो.
Share your comments