Epfo News: बरेच जण खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करत असतात. अशा प्रत्येकाला ईपीएफओ ची सुविधा मिळते. परंतु आपल्याला माहीत असेलच की, तुम्हाला अनेक वेळा ई नामांकन दाखल करण्याचे स्मरणपत्र देखील मिळाले असेल. कारण हे करणे खूप गरजेचे आहे नाहीतर तुम्ही तुमचे पैसे पीएफ मधून काढू शकत नाहीत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे जे कोणी सदस्य आहेत अशा सर्वांना ई नॉमिनेशन करणे अनिवार्य आहे.
जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला पीएफ बॅलन्स सोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ज्या काही ऑनलाईन सुविधा आहेत त्यांचा सुद्धा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. याबाबतीत ईपीएफओने सांगितले होते की,
जर ईपीएफ सदस्याला ईपीएफ अथवा ईपीएस मध्ये सद्यस्थितीत असलेले नोमिनेशन जर बदलायचे असेल तर ते नवीन नॉमिनेशन दाखल करू शकतात. जेव्हा तुम्ही नवीन नॉमिनेशन दाखल कराल तेव्हा तुमचे जुने नामनिर्देशन रद्द होईल.
नॉमिनी किती व्यक्ती असू शकतात?
ई नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये एक कर्मचारी त्याच्या कुटुंबातील एका पेक्षा जास्त सदस्यांना नॉमिनेटेड करू शकते. भविष्यात ई नॉमिनेशन जर केले नाही तर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याचे पीएफ खात्यात जे काही पैसे जमा झालेले असतील ते पूर्ण अडकतील व त्यांच्या कुटुंबीयांना हे पैसे काढणे खूप जिकिरीचे होईल.
जर तुम्हाला ई नॉमिनेशन करायचे असेल तर तुमच्याकडे युएएननंबर आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे.तसे पाहायला गेले तर या दोन्ही गोष्टी प्रत्येक पीएफ खाते दाराकडे असतातच. या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो अपडेट करावा लागेल.
परंतु तुम्हाला तुमच्या प्रोफाईल फोटो शिवाय नामांकन दाखल करायचे असेल तर तुम्हाला 'इनेबल टू प्रोसेस' हा मेसेज दिसेल. त्यामुळे तुम्ही आधी तुमच्या प्रोफाईल फोटो अपडेट करणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत करा एकदाच गुंतवणूक,मिळतील दरमहा पैसे
ई नोमिनेशन कसे करायचे? जाणून घ्या प्रक्रिया
1- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला epfindia.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल व त्यानंतर तुमचा युएएननंबर आणि पासवर्ड च्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
2- त्या ठिकाणी सर्विस टॅबवर जाऊन ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून 'कर्मचाऱ्यांसाठी'या टॅबवर क्लिक करा.
3- त्यानंतर 'व्यवस्थापित करा' या टॅबच्या माध्यमातून ई नामांकन हा पर्याय निवडा व नंतर तुमचा कायम आणि तात्पुरता पत्ता प्रविष्ट करा.
4-नंतर तुमचा नामनिर्देशित तपशील जो आहे तो प्रविष्ट करा.तसेच तुम्हाला नॉमिनीचा फोटोदेखील अपलोड करावा लागेल व नंतर सेव्हवर क्लिक करा.
5- 'प्रोसीड' वर क्लिक करा.
नक्की वाचा:पेन्शनधारकांसाठी खुशखबर! EPFO ने सुरू केली ही नवीन सुविधा
Share your comments