
Drip irrigation
काळाच्या ओघात शेतकरी सुद्धा आपल्या पीक पद्धतीत बदल करत आहेत. पाण्याची बचत व्हावी यासाठी शेतकरी विविध प्रयोग ही शोधून काढत आहेत. पहिल्या म्हणजेच जुन्या पद्धतीने शेतकरी पिकांना पाठाद्वारे पाणी देत असायचे मात्र काळाच्या बदलानुसार शेतकरी आता ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याची तर बचत होतेच त्याचबरोबर खताचे सुद्धा योग्य प्रकारे व्यवस्थापन होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ठिबकचा दोन्ही बाजूने फायदा होत आहे. पाण्याची बचत तर होत आहेत त्याचबरोबर योग्य प्रमाणात पिकांना खताचा व औषधांचा पुरवठा सुद्धा होत आहे. ही पद्धत अवलंबिण्यास शेतकऱ्यांना उशीर तरी झाला आहे मात्र आता अगदी झपाट्याने यामध्ये वाढ होत निघाली आहे.
ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यामुळे होणारे फायदे :-
१. ठिबकद्वारे खत दिल्यास योग्य प्रमाणात खतांचा वापर होतो त्यामुळे खतांच्या मात्रेत बचतही होते.
२. झाडांच्या गरजेनुसार खतांची मात्रा दिल्यास उत्पन्नात सुद्धा वाढ होते.
३. ठिबक सिंचनाचा वापर करून झाडांना खत दिल्यास समप्रमानत झाडांना खत भेटते.
४. या पद्धतीने खते दिल्यास मजुरांचा ही खर्च वाचतो.
खते निवडताना ही घ्या काळजी :-
१. ठिबक सिंचनाद्वारे जर झाडांना खते द्यायची असतील तर ती खते पाण्यात विरघळणारी असावी अशी खते निवडा.
२. खतांच्या मिश्रणाचा विपरीत परिणाम हा ठिबक सिंचनाच्या संचातील घटकांवर होऊ नये अशी खते निवडावी.
३. ठिबक सिंचनाद्वारे झाडांना ने खत देणार आहे त्या खताचे मिश्रण होऊन पाण्यात कोणती रासायनिक प्रक्रिया होणार नाही अशी खते निवडावी.
ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची खते नत्र खते :-
युरिया सल्फेट, अमोनिया हे सर्वसाधारण खते आहे. जे की युरिया हे खत पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळते जे की पाण्याशी कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया होत नाही त्यामुळे हे खत ठिबक सिंचनाद्वारे देणे फायदेशीर आहे.
स्फुरदयुक्त खते :-
अमोनिअम फॉस्फेट ( 16: 20 : 0 ), युरिया फॉस्फेट ( 17: 43 : 0 ), मोनो अमोनिअम फोस्फेट ( 18:46 : 0 ) यांसारखी खते पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळतात त्यामुळे तुम्ही ठिबक सिंचनाद्वारे ही खते झाडांना देऊ शकता. फॉस्फरिक आम्ल हे सुद्धा ठिबक सिंचनाद्वारे झाडांना देणे आवश्यक आहे.
Share your comments