1. इतर बातम्या

किसान विकास पत्र योजनेद्वारे दुप्पट करा आपला पैसा; हजार रुपयांपासून करु शकता गुंतवणूक

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त गुंतवणूक योजना आणली आहे. यात पैसा गुंतवल्यानंतर शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम मिळत असते. ही योजना आहे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra ).

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त गुंतवणूक योजना आणली आहे. यात पैसा गुंतवल्यानंतर शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम मिळत असते.  ही योजना आहे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra ).  यात पैसा गुंतवल्यानंतर आपला पैसा लवकरच दुप्पट होतो, गुंतवणुकीची सुरुवात आपण १००० रुपयांपासूनही सुरू करू शकतात.  जर कोणाला दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे. ही योजना देशातील सर्व पोस्ट कार्यालयात म्हणजेच टपाल कार्यालयात उपलब्ध असते.

दीर्घ काळासाठी ही योजना खूप लाभकारक आहे. या योजनेची मॅच्युरिटी  १२४ महिने म्हणजेच १० वर्ष ४ महिने अशी आहे. यात गुंतवणुकीची सुरुवात आपण एक हजार रुपयांपासून करु शकतो.  एक हजार ते आपली इच्छा असेपर्यंतची रक्कम आपण या योजनेत गुंतवू शकतो.  दरम्यान ग्राहकांना आपला पैसा बुडण्याची भिती असते. कारण बाजारात अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना आहेत ज्यातून ग्राहकांची फसवणूक होत असते. परंतु किसान विकास पत्र योजनेच्या सुरक्षेची हमी केंद्र सरकार घेते, यामुळे आपला पैसा बुडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.

दरम्यान ही योजना वन टाईम इन्वेस्टमेंट योजना आहे. याची सुरुवात १००० पासून होते. त्यानंतर यात ५ हजार , १० हजार पासून ते ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाते.  किसान विकास पत्र हे दोन प्रकारचे असते.  सिंगल होल्डर सर्टिफिकेट अडल्ट  किंवा माइनर पद्धतीने सुरु करु शकतात.  जॉईट होल्डर दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात दोन्ही खातेधारकांना मॅच्युरिटीवर बेनिफिट मिळते. दुसऱ्या प्रकारातील कोणत्यातरी एकाला मॅच्युरिटीवर पुर्ण पैसे मिळतात.

 


किसान विकास पत्रावर आता ६.९ टक्के व्याज मिळते. सध्या दिले जाणारे व्याज हे १२४ महिन्याच्या हिशोबानुसार ही रक्कम दुप्पट होत असते. टपाल कार्यालयाची ही योजना असल्याने व्याज दराचे कॅलक्युलेशन हे तिमाही असते. म्हणजेच तीन महिन्यावर व्याजदर निश्चित केले जाते. मार्चपर्यंतच्या तिमाहीत व्याज दर ७.७  टक्के होते,त्यावेळी ११२ महिन्यात दुप्पट होत होते. डिसेंबर २०१९ तिमाहीत  व्याजदर ७.७ टक्के होते. 

जर आपल्याला किसान विकास पत्रात गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला एक ओळखपत्र, रहिवाशी दाखला, आधार कार्ड, आणि पॅन कार्ड या कागदपत्राची आवश्यकता असते.  याशिवाय मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट हे कागदपत्रांच्या मदतीने आपण या योजनेत गुंतवणूक करु शकतात.  आपल्या जवळील पोस्ट कार्यालयात जाऊन एक अर्ज आपल्याला भरावा लागतो. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर  आपले किसान विकास पत्र खाते उघडले जाते.  या अर्जात खातेधारकांचे नाव, मॅच्युरिटी तारीखसह इतर माहिती द्यावे लागते.

दरम्यान किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यास आपल्याला आयकरमध्ये कोणताच लाभ  मिळत नाही.   रिटर्न पूर्णपणे टॅक्सेबल असते. पण टीडीएस कापल्या जात नाही.  याचा एक फायदा असा आहे की, याचा उपयोग आपण कर्जासाठी सिक्युरिटी कागदपत्राच्या रुपात केला जाऊ शकतो. याच्या आधारे मिळणाऱ्या कर्जावर व्याज कमी लागते.

English Summary: Double your money through Kisan Vikas Patra Yojana, you can invest from Rs 1000 Published on: 04 September 2020, 05:55 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters