1. इतर बातम्या

प्रीपेड नंबरचं करणं पोस्टपेड अन् पोस्टपेडचं करा प्रीपेड नंबर करणं झालं सोपं; जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर रोजी कॅबिनेट मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये मोबाइल सिम कार्ड (Mobile Sim Card) संबंधी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता नवीन कनेक्शन घेतल्यास किंवा प्रीपेड नंबरला पोस्टपेड मध्ये किंवा पोस्टपेडला प्रीपेडमध्ये बदलण्याची प्रोसेस खूप सोपी झाली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर रोजी कॅबिनेट मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये मोबाइल सिम कार्ड (Mobile Sim Card) संबंधी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता नवीन कनेक्शन घेतल्यास किंवा प्रीपेड नंबरला पोस्टपेड मध्ये किंवा पोस्टपेडला प्रीपेडमध्ये बदलण्याची प्रोसेस खूप सोपी झाली आहे.

याशिवाय, आता तुम्हाला आधीप्रमाणे कोणताही फिजिकल फॉर्म भरायचा नाही. टेलिकॉम कंपन्या या फॉर्म भरण्याचे काम डिजिटल पद्धतीने करू शकतील. म्हणजेच तुम्हाला घरी बसून काम करता येईल, कॅबिनेट बैठकीत सरकारने या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

१ रुपयात चार्ज देवून होणार काम

PIB च्या वेबसाइटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे E-KYC अॅपवर आधारित असेल. म्हणजेच सेवा देणारी कंपनी अॅपवर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करतील. ज्याच्या आधारवर केवायसी होईल. सेल्फ KYC साठी तुम्हाला फक्त १ रुपया खर्च करावा लागणार आहे. नियमांनुसार, जर कोणताही ग्राहक आपल्या प्रीपेड नंबरला पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेड मधून प्रीपेडमध्ये चेंज करीत असेल तर प्रत्येकवेळी केवायसी प्रोसेस पूर्ण गरजेचे आहे. परंतु, आता फक्त एकदा केवायसी करावी लागणार आहे.

 

सेल्फ KYC काय असते

केवायसीसाठी कंपनी ग्राहकांना काही डॉक्युमेंट मागते. आधी हे काम स्वतः कस्टमर केयर सेंटर जावून करावे लागत होते. परंतु, आता हे स्वतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ज्यावेळी तुम्ही तुमची केवायसी करता त्याला सेल्फ केवायसी म्हटले जाते. हे वेबसाइट किंवा अॅप्लिकेशन द्वारे केले जावू शकते.

Self KYC द्वारे सर्वात आधी सिम प्रोव्हाइडरचे अॅप्लिकेशन फोनमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर एक अलटरनेट नंबर सुद्धा द्यावा लागेल. जो तुमच्या ओळखीचा असेल. यानंतर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल. यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. यात सेल्फ KYC चा ऑप्शन निवडावा लागेल. मागितलेली संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.

English Summary: Doing prepaid numbers Postpaid and postpaid Doing prepaid numbers is easy; Learn the new rules Published on: 18 September 2021, 05:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters