
electricity bill
अलीकडे विजेचा वापर खूपच वाढला आहे. घरात विजेवर चालणाऱ्या वस्तू अधिक झाल्यामुळे विजेच बिल देखील आता खूपच अधिक येत आहे. मात्र आता वीज बिल जास्त येत असेल तर काळजी करण्याची गरजचं भासणार नाही. मित्रांनो AC मुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुमच्या घराचे बिल खूप जास्त आले असेल तर एकदा तुम्ही तुमच्या घराच्या AC कडेही नक्कीच लक्ष द्या.
उन्हाळ्याच्या हंगामात पाहिले तर अनेकदा प्रत्येकाच्या घरातील वीज बिलात लक्षणीय वाढ होते. वीज बिल जास्त येण्याची अनेक कारणे असू शकतात. यासोबतच तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेऊन वीजबिल मात्र कमी करू शकता.
चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत. माहितीतं सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यानंतर तुम्ही सहज तुमच्या घराच्या वीजबिलात मोठी कपात करू शकता. आणि तुमचे मासिक वीज बिल 3,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते, चला तर मग मित्रांनो त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
उन्हाळ्यात आपण पाहतो की, जास्त वीज बिल येण्याचे एकच कारण असते, तो म्हणजे एसीचा मोठ्या प्रमाणात वापर. घराचे वीज बिल जास्त येत असेल तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आम्ही तुम्हाला एसी वापरू नका असा सल्ला नाही देत तर तुमच्या घरात सामान्य AC बसवला असेल तर त्या ऐवजी इन्व्हर्टर एसी बसवण्याचा आम्ही सल्ला देऊ. जाणकार लोकांच्या मते, इन्व्हर्टर AC बसवल्यानंतर विज बिल कमी होण्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो. हा वीज वापर लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. कंपनीचा दावा आहे की, इन्व्हर्टर AC बसवल्यास, वीज बिल 25 ते 40% पर्यंत काम करू लागते.
स्वयंपाकघरातील चिमनीचा फायदा घ्या
स्वयंपाकघरातील चिमणी देखील भरपूर वीज वापरण्यास सुरवात करते. त्याऐवजी वेंटिलेशनचे दुसरे ठिकाण शोधणे तुमच्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे. चिमनी सतत वापरल्याने वीज बिल खूप जास्त येते. त्याच वेळी, स्वयंपाकघरातील धूर फार वेगाने बाहेर पडत नाही. यामुळे यासाठी दुसऱ्या उपाययोजना करणे महत्त्वाचे राहणार आहे.
Share your comments